Jump to content

सरोज सुधीर टोळे


सौ. सरोज सुधीर टोळे (माहेरचे नाव सरोज मोरेश्वर वाळंबे) (21जानेवारी 1948) मराठी संपादिका आहेत.[]

व्यक्तिगत जीवन

त्या मराठी व्याकरणकार कै. मोरेश्वर रामचंद्र वाळंबे यांच्या कन्या आहेत.

कारकीर्द

कुमार भारतीच्या शालेय पुस्तकांची हस्तलिखिते बनवून देण्यापासून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनसाठी अनौपचारिक शिक्षणविषयक साहित्य निर्मितीत भाग घेतला. 'निर्मळ रानवारा' या मुलांसाठीच्या नियतकालिकाचे संपादकीय काम केले. आकाशवाणी(पुणे) साठी लेखन आणि कार्यक्रम केले.

त्या फुलोरा हा अंध विद्यार्थ्यांसाठी असलेला दिवाळी अंक काढतात आणि अंध विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांचे ब्रेल लिपीत रूपांतरण करतात. कमी उत्पन्न ग्टातील महिलांसाठीच्या 'स्नेहलता नवचैतन्य प्रतिष्ठान'च्या कार्याध्यक्षा, हिरकणी भक्तिगीत मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष.

लेखन

  • निवडक लेखनाचा विशेषांक - प्रकाशक (निर्मळ रानवारा)
  • गवत फुले (कविता संग्रह)
  • बालगाणी (कविता संग्रह)
  • गोष्टी सरोज ताईच्या
  • शिवानीच्या गोष्टी
  • शोनीलच्या गोष्टी
  • हसा आणि हसवा
  • कोडी
  • १० नाटूकली
  • १० नाट्यछटा
  • निवृत्ती (कादंबरी)

पुरस्कार

सौ.सरोज टोळे यांना मिळालेले पुरस्कार
  • रमाबाई रानडे पुरस्कार
  • माजगावकर पुरस्कार
  • कोथरूड सांस्कृतिक पुरस्कार

संदर्भ

  1. ^ "संग्रहित प्रत". 2021-03-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-07-13 रोजी पाहिले.