Jump to content

सरोजिनी वैद्य

सरोजिनी वैद्य
जन्म नाव सरोजिनी शंकर वैद्य
जन्मजून १५, १९३३
अकलूज, महाराष्ट्र, भारत
मृत्यूऑगस्ट ३, २००७
पुणे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्र लेखिका, प्राध्यापिका, समीक्षिका
भाषामराठी
साहित्य प्रकार ललित साहित्य, समीक्षण, व्यक्तिचरित्र
पती शंकर विनायक वैद्य
अपत्ये निरंजन शंकर वैद्य

सरोजिनी वैद्य ( :जून १५, १९३३ - - ३ ऑगस्ट २००७) या मराठीतील लेखिका, समीक्षिका होत्या. ललितलेखन, चरित्रलेखन, समीक्षा या साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केले. मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागप्रमुखपदी, तसेच राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालकपदी त्यांनी काम केले.

मराठी कवी शंकर वैद्य हे त्यांचे पती.

जन्म व शिक्षण

१५ जून १९३३ रोजी सरोजिनीबाईचा जन्म पुण्यात झाला. पुण्यातील हुजूरपागा शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले.[]

प्रकाशित साहित्य

  • आठवणी काळाच्या माणसांच्या
  • कहाणी लंडनच्या आजीबाईंची
  • द.ग. गोडसे यांची कलामीमांसा (संपादन; सहसंपादक- वसंत पाटणकर)
  • नानासाहेब फाटक: व्यक्ती आणि कला
  • पहाटगाणी
  • माती आणि मूर्ती
  • रमाबाई रानडे: व्यक्ती आणि कार्य
  • वासुदेव बळवंत पटवर्धन : जीवन आणि लेखन
  • शेजवलकर : व्यक्तित्व आणि कर्तृत्व
  • संक्रमण
  • समग्र दिवाकर

संदर्भ व नोंदी


  1. ^ कर्वे, स्वाती (१५ ऑगस्ट २०१२). १०१ कर्तुत्ववान स्त्रिया. पुणे: उत्कर्ष प्रकाशन. pp. १११. ISBN 978-81-7425-310-1.