सरे व्हिलेज क्रिकेट मैदान
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | सरे व्हिलेज, मग्गोना, कालुतारा जिल्हा |
गुणक | 6°30′46″N 79°59′36″E / 6.51278°N 79.99333°E |
स्थापना | २०११ |
शेवटचा बदल ९ मार्च २०१७ स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर) |
सरे व्हिलेज क्रिकेट मैदान हे मग्गोना, श्रीलंका येथील, २०११ मध्ये खुले झाल्यापासून, प्रथम श्रेणी, लिस्ट अ आणि इतर क्रिकेट सामन्यांसाठी वापरले जाणारे मैदान आहे.
स्थान
मैदान सरे व्हिलेज, मग्गोना येथे समुद्र आणि मग्गोना रेल्वे स्थानकापासून सुमारे १ किमी अंतरावर आहे. मग्गोना कालुताराच्या दक्षिणेस सुमारे १० किमी अंतरावर आहे.
इतिहास
२००४ च्या त्सुनामी मधून बचावलेल्या श्रीलंकेच्या काही नागरिकांसाठी, इंग्लंडमधील सरे काउंटी क्रिकेट क्लब आणि श्रीलंका क्रिकेट मंडळ, एक गाव तयार करण्यासाठी पैसे उभारण्याच्या दृष्टीने एकत्र आले. सरेचे होम ग्राउंड द ओव्हल येथे २० जून २००५ रोजी, आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू एका ट्वेंटी२० सामन्यात सहभागी झाले,[१] आणि प्रकल्पासाठी सुमारे १० लाख पाऊंड उभारले गेले.[२] वनक्षेत्र साफ करून सरे व्हिलेज नावाचे गाव तयार केले गेले आणि सरेच्या क्रिकेट खेळाडूंची नावे त्या गावातील रस्त्यांना देण्यात आली.[३]
मैदान अधिकृतपणे मे २०११ मध्ये खुले करण्यात आले.[४] तेव्हापासून श्रीलंकेच्या पुरुष, महिला आणि कनिष्ठ खेळाडूंच्या अनेक क्रिकेट स्पर्धा आणि दौरा करणाऱ्या संघांचे सराव सामने येथे खेळवले जातात.[५]
ह्या मैदानावर पहिला प्रथम श्रेणी सामना फेब्रुवारी २०१२ मध्ये बादुरेलिया स्पोर्ट्स क्लब, ज्यांनी ह्या मैदानाला आपले होम ग्राऊंड बनवले आणि मूर्स स्पोर्ट् क्लब यांच्या दरम्यान खेळवला गेला..[६] पहिला लिस्ट अ सामान येथे रागामा क्रिकेट क्लब आणि श्रीलकां एयर फोर्स क्लब दरम्यान डिसेंबर २०१३ रोजी खेळवला गेला.[७]
ह्या मैदानावरील सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या जानेवारी २०१६ मध्ये सिंहलीज स्पोर्ट्स क्लब तर्फे खेळताना मिनोद भानूका ह्याने बादुरेलिया स्पोर्ट्स क्लब विरुद्ध, ३४२ धावा फटकावून स्थापित केली. [८] सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करण्याचा मान बादुरेलियाच्या गयान सिरिसोमा ह्याला मिळाला. त्याने फेब्रुवारी २०१५ मध्ये श्रीलंका एर फोर्स स्पोर्ट्स क्लबविरुद्ध ४६ धावांत ७ गडी बाद केले.[९]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "आंतरराष्ट्रीय XI वि आशियाई XI, २००५". क्रिकेटआर्काइव्ह. ९ मार्च २०१७ रोजी पाहिले.
- ^ "अ श्रीलंकन व्हिलेज रिबिल्ट – थँक्स टू सरे काउंटी क्रिकेट क्लब". ९ मार्च २०१७ रोजी पाहिले.
- ^ माउंटफोर्ड, अॅडम. "सरे इन कॉर्नर ऑफ श्रीलंका". बीबीसी. ९ मार्च २०१७ रोजी पाहिले.
- ^ "मग्गोनामधील सरे क्रिकेट मैदान खुले झाल्याची समारंभपूर्वक घोषणा". संडे लीडर. 2017-10-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ९ मार्च २०१७ रोजी पाहिले.
- ^ "सरे व्हिलेज क्रिकेट मैदान येथे खेळवले जाणारे इतर सामने". क्रिकेटआर्काइव्ह. ९ मार्च २०१७ रोजी पाहिले.
- ^ "सरे व्हिलेज क्रिकेट मैदान, मग्गोना वरील प्रथमश्रेणी क्रिकेट सामने". क्रिकेटआर्काइव्ह. ९ मार्च २०१७ रोजी पाहिले.
- ^ "सरे व्हिलेज क्रिकेट मैदान, मग्गोना वरील लिस्ट अ क्रिकेट सामने". क्रिकेटआर्काइव्ह. ९ मार्च २०१७ रोजी पाहिले.
- ^ "बादुरेलिया स्पोर्ट्स क्लब वि सिंहलीज स्पोर्ट्स क्लब, २०१५-१६". क्रिकेट आर्काईव्ह. ९ मार्च २०१७८ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "बादुरेलिया स्पोर्ट्स क्लब वि श्रीलंका एयर फोर्स स्पोर्ट्स क्लब २०१४-१५". क्रिकेट आर्काइव्ह. ९ मार्च २०१७ रोजी पाहिले.