सरवणा भवन
चित्र:Saravana Bhavan.JPG अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्यातील एडिसन शहरात असलेले सरवणा भवन |
सरवणा भवन(तमिळ:சரவணா பவன்) ही मुख्यत्वे दक्षिण भारतीय पदार्थ वाढणारी होटेल साखळी आहे. याची स्थापना १९८१मध्ये चेन्नईमध्ये झाली.[१] या साखळीच्या भारतात ३३ (पैकी चेन्नईमध्ये २४) आणि जगभरात इतर ७८ शाखा आहेत.[२][३]
इतिहास
सरवणा भवनची सुरुवात १९८१मध्ये पी. राजगोपाल यांनी सुरू केलेल्या चेन्नईच्या उपनगरातील एका छोट्या दुकानापासून झाली.[४] १९९२मध्ये सिंगापूरला गेले असताना त्यांनी प्रचंड मोठ्या बहुराष्ट्रीय होटेल साखळ्यांची (मॅक्डॉनल्ड्स, इ.) कार्यपद्धती पाहिली. त्यांनी ही पद्धत आपल्या होटेलमध्ये चालविण्याचे ठरविले.[५]
१९९० च्या दशकात सरवणा भवनने चेन्नईमध्ये अनेक शाखा उघडल्या. २००० साली परदेशातील पहिली शाखा दुबई येथे सुरू झाली.
सरवणा भवनमध्ये भारतीय खाद्यपदार्थ मिळत असले तरी दक्षिण भारतीय पदार्थ यांची खासियत आहे.[६]
परदेशी शाखा
२००० सालानंतर पॅरिस, फ्रांकफुर्ट, लंडन, न्यू यॉर्क, डॅलस, स्टॉकहोम, टोराँटो, दोहा, ऑकलंड, रियाध सह अनेक शहरांमध्ये शाखा उघडल्या गेल्या. येथे काम करण्यासाठी सरवणा भवन भारत व अमेरिकेतून कामगार पाठवतात.[७] या शाखा बव्हंश फ्रँचायझी चालवितात.[८]
२०२४मध्ये सरवणा भवनच्या खालील देशांमधून शाखा आहेत.
- भारत
- ऑस्ट्रेलिया
- न्यू झीलँड
- मलेशिया
- ओमान
- कॅनडा
- फ्रांस
- बेल्जियम
- जर्मनी
- सिंगापूर
- बहरैन
- संयुक्त अरब अमीराती
- युनायटेड किंग्डम
- कुवैत
- अमेरिका
- सौदी अरेबिया
- कतार
- हाँग काँग
- थायलंड
- नेदरलँड्स
- स्वीडन
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Founder & Key Personalities". Saravana Bhavan. 2007-05-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2007-05-31 रोजी पाहिले.
- ^ Berry, Rynn; Suzuki, Chris A.; Litsky, Barry (2006). The Vegan Guide to New York City. Ethical Living. p. 27. ISBN 0-9788132-0-0. 2008-07-03 रोजी पाहिले.
- ^ Addison, Bill (2006-06-30). "Diners line up for Saravana dosas". San Francisco Chronicle. 2008-07-03 रोजी पाहिले.
- ^ Romig, Rollo (7 May 2014). "Masala Dosa to Die For". 12 April 2019 रोजी पाहिले – NYTimes.com द्वारे.
- ^ The Hindu, Friday, 21 August 1998
- ^ "Coconuts Hong Kong Hot Spot food review of Indian restaurant Saravana Bhavan". Coconuts. 18 November 2015. 12 April 2019 रोजी पाहिले.
- ^ Management, Strategic; Asia-Pacific; China; India; America, North. "Indian Restaurant Chains Have Overseas Expansion on Their Menus". Knowledge@Wharton. 12 April 2019 रोजी पाहिले.
- ^ "Saravana Bhavan plans foray into hospitality sector after it strengthens international presence further". economic times. 3 November 2012. 28 October 2021 रोजी पाहिले.