सरदार विंचूरकर वाडा (पुणे)
सरदार विंचूरकर वाडा हा महाराष्ट्राच्या पुणे शहरातल्या सदाशिव पेठेतील वाडा आहे.
मराठी राजकारणी, पत्रकार बाळ गंगाधर टिळक गायकवाड वाड्यावर वास्तव्यास जाण्यापूर्वी विंचूरकर वाड्यात रहात असत. केसरी छापखानाही सुरुवातीस याच वाड्यात होता. बाळ गंगाधर टिळक आणि स्वामी विवेकानंदांची भेटही याच वाड्यात झाली होती. या वास्तूची मालकी कृष्णकुमार दाणी यांच्याकडे होती. त्यानंतर ती वास्तू परांजपे स्कीम कन्स्ट्रक्शन कंपनीने घेतली.