Jump to content

सरग बाड्डा

सरग बाड्डा या पक्ष्यास इंग्रजी भाषेमध्ये Pintail असे म्हणतात.मराठीमध्ये या पक्ष्यास सरग बाड्डा,सरगे बाड्डा,सरग्या तर हिंदीमध्ये डिगोंच,संद,सिंखपर,सिखपर आणि संस्कृत भाषेमध्ये त्यास दीर्घपुच्छ शंकुपत्र,शंकुहंस,शंकु हंसक शल्यहंस असे म्हणतात.तर गुजराती मध्ये सिंगपर,कन्नडमध्ये कुलुमिलुकन बातु आणि तमिळमधे त्यास मार्कलियन असे म्हणतात. त्याचा आकार हा बदकापेक्षा लहान असतो नराच्या वरच्या भागाचा रंग करडा असून त्यावर बारीक कड्या आहेत त्याचे डोळे हे कथ्थारंगाचे असतात मानेच्या दोन्हीही बाजूंना पांढरा पट्टा असून मानेचा व खालच्या अंगाचा रंग पांढरा असतो त्याची पिसे ही दाभणासारखी लांब टोकदार असून ती शेपटीपेक्षा लांब असतात. तर मादीच्या अंगावर उदी आणि बदामी रंगाचे ठिपके असतात व लांबट शरीर असते शंकूच्या आकाराची शेपटी असते आणि शेपटीला नारासारखी टोकदार लांब पिसे नसतात. नर व मादी हे दोघेही जोडीने किंवा थव्याने आढळून येतात हा पक्षी आभाळात म्हणजे स्वर्गात उडत असतात,म्हणून त्यास सरग्या असे म्हणतात हा पक्षी भारत आणि श्रीलंकेमध्ये हिवाळी पाहुणे म्हणून आढळतात तसेच हा पक्षी मालदीव बेटात ही आढळून येतो तसेच युरोप,आशिया,अमेरिका आणि ब्रिटिश बेटे येथे ही आढळतात.

हे पक्षी जास्तीत जास्त झिलाणी,सरोवरे,नद्या,आणि समुद्रकिनारी निवास करतान दिसून येतात

Northern Pintail male RWD

संदर्भ

पुस्तकाचे नव:-पक्षिकोश

लेखकाचे नव:-मारुती चितमपल्ली