सय्यद किरमाणी
भारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
भारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा. |
सय्यद किरमाणी | ||||
व्यक्तिगत माहिती | ||||
---|---|---|---|---|
फलंदाजीची पद्धत | --- | |||
गोलंदाजीची पद्धत | --- | |||
कारकिर्दी माहिती | ||||
{{{column१}}} | {{{column२}}} | {{{column३}}} | {{{column४}}} | |
सामने | {{{सामने१}}} | {{{सामने२}}} | {{{सामने३}}} | {{{सामने४}}} |
धावा | {{{धावा१}}} | --- | {{{धावा३}}} | {{{धावा४}}} |
फलंदाजीची सरासरी | --- | --- | {{{फलंदाजीची सरासरी३}}} | {{{फलंदाजीची सरासरी४}}} |
शतके/अर्धशतके | --- | --- | {{{शतके/अर्धशतके३}}} | {{{शतके/अर्धशतके४}}} |
सर्वोच्च धावसंख्या | --- | --- | {{{सर्वोच्च धावसंख्या३}}} | {{{सर्वोच्च धावसंख्या४}}} |
चेंडू | {{{चेंडू१}}} | {{{चेंडू२}}} | {{{चेंडू३}}} | {{{चेंडू४}}} |
बळी | --- | --- | {{{बळी३}}} | {{{बळी४}}} |
गोलंदाजीची सरासरी | --- | --- | {{{गोलंदाजीची सरासरी३}}} | {{{गोलंदाजीची सरासरी४}}} |
एका डावात ५ बळी | --- | --- | {{{५ बळी३}}} | {{{५ बळी४}}} |
एका सामन्यात १० बळी | --- | {{{१० बळी२}}} | {{{१० बळी३}}} | {{{१० बळी४}}} |
सर्वोत्तम गोलंदाजी | --- | --- | {{{सर्वोत्तम गोलंदाजी३}}} | {{{सर्वोत्तम गोलंदाजी४}}} |
झेल/यष्टीचीत | --- | --- | {{{झेल/यष्टीचीत३}}} | {{{झेल/यष्टीचीत४}}} |
सय्यद किरमाणी हे भारतीय क्रिकेट संघात यष्टिरक्षक होते. भारतीय खेळपट्ट्यांवर फिरकी गोलंदाजीवर यष्टिरक्षण करताना त्यांना हेल्मेट वापरण्याची कधी गरजच भासली नाही.
किरमाणी यांनी प्रथम वर्गीय क्रिकेटमधील २७५ सामन्यांत ३६७ झेल व ११२ यष्टिचीत अशी कामगिरी नोंदविली. त्यांच्या नावावर एक कसोटी बळीही आहे.
फारूख इंजिनियर यांच्यानंतर किरमाणी यांनी भारतीय संघात यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळली. १९७६मध्ये न्यू झीलंडविरुद्ध कसोटी पदार्पण करणाऱ्या किरमाणी यांनी भारताच्या बड्या स्पिनर्सच्या गोलंदाजीवर कठीण प्रसंगी नेटाने यष्टिरक्षण केले. आपल्या दशकभराच्या कारकिर्दीत त्यांची ऊर्जा आणि मैदानावरील वावर लक्षणीय असे. खालच्या क्रमांकावर फलंदाजीस येऊनही त्यांनी दोन कसोटी शतके झळकावली.
१९८१-८२मधील भारताच्या इंग्लंडविरुद्धच्या सलग तीन कसोटींमध्ये किरमाणी यांनी एकही बाय दिला नव्हता. १९८३ च्या वर्ल्डकपमध्ये टनब्रिज वेल्स येथील झिम्बाब्वेविरुद्धच्या लढतीत किरमाणी यांनी कपिल देवसह नाबाद १२६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली होती. त्यावेळी बलाढ्य समजल्या जाणाऱ्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या सहाव्या कसोटीत किरमाणी यांनी सुनील गावसकर यांच्यासह नवव्या विकेटसाठी रचलेली नाबाद १४३ धावांची भागीदारीही खास ठरली होती. त्यावेळी गावसकर यांनी नाबाद २३६ धावा केल्या होत्या. तेव्हा एखाद्या भारतीयाने विंडीजविरुद्ध केलेली ती सर्वोच्च खेळी ठरली होती.
सय्यद किरमाणी यांच्या काही अन्य स्मरणीय खेळी
- ऑक्टोबर १९८३मध्ये नागपूर येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अनिर्णित राहिला. औपचारिक ठरलेल्या पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात किरमाणी यांनी हातातले ग्लोव्हज काढत गोलंदाजी केली. पाकिस्तानचा सलामीवीर अझीम हाफीज याचा त्रिफळा उडवून गोलंदाजीतील "बळी'ही मिळविला.
पुरस्कार
- भारतीय सरकारतर्फे सय्यद किरमाणी यांना १९८२मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते. ते कर्नाटकचे उपकर्णधार होते, तसेच राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.
यष्टिरक्षक सय्यद किरमाणी यांची कर्नल कोटारी कंकय्या नायडू सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ट्रॉफी आणि २५ लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.