सम्राट
सम्राट (इंग्रजी: Emperor) हा अनेक राज्ये जिंकून व सामील करून बनलेल्या मोठ्या सार्वभौम साम्राज्याचा शासक असतो. सम्राटांना राजा-महाराजांपेक्षा उच्च प्रतिष्ठा असते.
सम्राटचे स्त्रीलिंग सम्राज्ञी आहे. हे बिरुद महिला सम्राटासाठी वापरतात. सम्राज्ञी ही सम्राटाची पत्नी, आई किंवा स्वतःच्या साम्राज्यावर राज्य करणारी एक स्त्री असू शकते.
अशोक, अकबर, चंद्रगुप्त मौर्य इत्यादींना भारतातील सर्वात प्रसिद्ध सम्राट मानले जाते.