समुद्री साप
समुद्री साप ही सापांची एक प्रजाती असून त्यांनी स्वतःला समुद्रात राहण्यास अनुकूल बनविले आहे. ते जमिनीवर संचार करु शकत नाहीत. समुद्री साप हा अत्यंत विषारी असतो. कोळी लोकांना हे साप मासेमारी दरम्यान आढळतात. हे साप आक्रमण अथवा हल्ला करण्याच प्रमाण फार कमी आहे. त्यामुळे त्याच्या दंशामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण तुलनेने कमी आहे. हे साप पोहोण्यामध्ये तरबेज असतात.हे साप भारतीय महासागरात व प्रशांत महासागराच्या उष्ण पाण्यात बहुदा आढळतात.या सापांना वल्हवण्याजोगी शेपटी असते व त्यांचे शरीर छोटेसे असते. त्यांना माश्याप्रमाणे कल्ले असत नाहीत व श्वास घेण्यास त्यांना वारंवार पृष्ठभागावर यावे लागते.
यांच्या सुमारे १७ प्रकारच्या प्रजाती आहेत ज्यात ६२ उपप्रकार आहेत.