Jump to content

समीक्षकांचे संमेलन


साहित्य समीक्षकांचे पहिले संमेलन २९-३० नोव्हेंबर २०१२ रोजी पुण्यात झाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे असणाऱ्या ८२ लक्ष रुपये निधीच्या व्याजातून हा उपक्रम झाला. संमेलनाध्यक्ष प्रा. के.रं. शिरवाडकर होते.

संमेलनाचा कार्यक्रम असा होता.

समीक्षा संमेलन २०१३

संमेलनाध्यक्ष - डाॅ. सुधीर रसाळ

समीक्षा संमेलन २०१४

संमेलनाध्यक्ष - डॉ. दिलीप धोंडगे

समीक्षा संमेलन २०१५

संमेलनाध्यक्ष - डॉ. नागनाथ कोत्तापल्ले

समीक्षा संमेलन २०१७

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे (शाहुपुरी-सातारा शाखा) आणि छत्रपती शिवाजी कॉलेज (सातारा)-मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २९ आणि ३० नोव्हेंबर २०१७ या काळात साताऱ्याला एक समीक्षा संमेलन झाले. अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक डॉ. हरिश्चंद्र थोरात होते.

या संमेलनाचे सूत्र 'समीक्षा : सिद्धान्त आणि व्यवहार' असे होते. संमेलनाचे उद्घाटन माजी संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते झाले.

समीक्षा संमेलन २०१८

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे (पंढरपूर शाखा) व कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय (पंढरपूर) यांच्या संयुक्त विद्यमाने १ डिसेंबर २०१८ रोजी पंढरपूर येथे एक दिवसीय समीक्षा संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले या संमेलनाचे अध्यक्ष होते.

हे ही पहा


संदर्भ आणि नोंदी