Jump to content

समस्थानिके

अणुक्रमांक, अर्थात प्रोटॉनांची संख्या समान असून अणुभार मात्र भिन्न असणाऱ्या अणूंना त्या मूलद्रव्याची समस्थानिके (अन्य मराठी नावे: समस्थानीय[]; इंग्लिश: Isotope, आयसोटोप ;) असे म्हणतात. समस्थानिकांच्या अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या समान असली, तरीही अणुकेंद्रातील न्यूट्रॉनांची संख्या भिन्न असल्यामुळे त्यांच्या अणुभारांत तफावत आढळते. उदाहरणार्थ, प्रोटियम H-1 (१ प्रोटॉन, ० न्यूट्रॉन), ड्यूटेरियम H-2 (१ प्रोटॉन, १ न्यूट्रॉन) आणि ट्रिशियम H-3 (१ प्रोटॉन, २ न्यूट्रॉन) ही हायड्रोजनची तीन समस्थानिके आहेत. प्रोटियमलाच आपण हायड्रोजन म्हणून ओळखतो. ड्यूटेरियमला जड हायड्रोजन असेही  म्हणतात. ट्रिशियम हे किरणोत्सारी मूलद्रव्य आहे.

संदर्भ

  1. ^ वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा.

बाह्य दुवे