समई ही देवाजवळ दिवा लावण्यासाठी वापरतात, आणि बहुतांश पितळ धातूचा वापर करून निर्माण केली जाते. तिच्यातली वात जळत राहण्यासाठी तेल किंवा तूप टाकतात. समई प्रकाशित करून हिंदू धर्मात देवी दैवतांची पूजा केली जाते. भारतात बहुतांश कार्यक्रमांची सुरुवात समईच्या दीपप्रज्वलनाने होते.[ चित्र हवे ]