समंथा रुथ प्रभू
समंता रुथ प्रभू | |
---|---|
जन्म | २८ एप्रिल, १९८७ चेन्नई, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय (चित्रपट), मॉडल |
कारकीर्दीचा काळ | इ.स. २००७ - चालू |
पती | |
टिपा दक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री |
समंथा रुथ प्रभू (पूर्वीचे अक्किनेनी; जन्म २८ एप्रिल १९८७) ही एक भारतीय अभिनेत्री आहे, जिने तेलुगू आणि तमिळ चित्रपटांत भरपूर नाव कमावले आहे. चार फिल्मफेअर पुरस्कार, एक फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार, दोन नंदी पुरस्कार, सहा दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि तीन CineMAA पुरस्कारांसह तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
अभिनयासोबतच ती अनेक ब्रँड आणि उत्पादनांसाठी एक प्रमुख सेलिब्रिटी चेहरा आहे. तसेच तिने २०१२ मध्ये महिला आणि मुलांना वैद्यकीय सहाय्य देण्यासाठी प्रत्युषा सपोर्ट ही स्वतःची एनजीओ देखील सुरू केली. फाऊंडेशनला सहाय्य देण्यासाठी ती जाहिराती, उत्पादन लॉन्च आणि उद्घाटन कार्यक्रमांमधून मिळालेली कमाई दान करते. तिने स्वतःच्या मालकीचा साकी नावाचा महिलांच्या कपड्यांचा ब्रँड स्थापन केला.[१] समंथाने २०१७ मध्ये अभिनेता नागा चैतन्यशी लग्न केले होते. ऑक्टोबर २०२१ मध्ये दोघांनी वेगळे होण्याची घोषणा केली.[२]
जीवन
समंथाचा जन्म २८ एप्रिल १९८७ रोजी तेलगू वडील जोसेफ प्रभू आणि मल्याळी आई निनेट प्रभू यांच्या पोटी केरळच्या अलाप्पुझा येथे झाला.[३] तिचे संगोपन चेन्नईजवळच्या पल्लवरम येथे झाले.[४] ती कुटुंबातील सर्वात लहान मूल असून तिला जोनाथन आणि डेव्हिड हे दोन मोठे भाऊ आहेत. पुढे ती अस्खलित तमिळ भाषा शिकली. मिश्र प्रादेशिक पार्श्वभूमी असूनही तिने स्वतःला तमिळ म्हणूनच उद्धृत केले.[५][६]
समंथाचे शालेय शिक्षण होली एंजल्स अँग्लो इंडियन हायर सेकेंडरी स्कूल येथे झाले. त्यानंतर चेन्नईच्या स्टेला मॅरिस कॉलेजमध्ये तिने वाणिज्य शाखेची पदवी पूर्ण केली. पदवीच्या शेवटी ती मॉडेलिंगमध्ये काम चालू केले. तिने विशेषतः नायडू हॉलमध्ये काम केले, जिथे ती पहिल्यांदा चित्रपट निर्माता रवि वर्मनच्या नजरेत आली.[७]
कारकीर्द
- २०१०: पदार्पण आणि यश
समंथाने तिच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात गौतम वासुदेव मेनन यांच्या तेलुगु चित्रपट, ये माया चेसावे (2010) मधून केली. तमिळमध्ये विनैतांडी वरुवाया (2010) या नावाने बनवलेल्या चित्रपटाने गौतम मेनन आणि संगीतकार ए.आर. रहमान यांच्यातील एकत्र कामामुळे रिलीज होण्यापूर्वी खूप अपेक्षा निर्माण केल्या होत्या.[८] समंथाने यशस्वीपणे ऑडिशन दिले. हा चित्रपट 26 फेब्रुवारी 2010 रोजी प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर समांथाला तिच्या भूमिकेसाठी खूप सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने समीक्षकांची प्रशंसा मिळवली.[९] "ये माया चेसवे"ने तिला सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार, तसेच प्रतिष्ठित नंदी पुरस्कार मिळवून दिला.[१०][११]
सामंथाचा पुढचा चित्रपट रोमँटिक ड्रामा असलेला बाना काठडी (2010) होता. हा चित्रपट खरंतर अभिनेत्रीने साइन केलेला तिसरा तमिळ प्रकल्प होता, परंतु पहिल्या दोन चित्रपटांच्या आधी प्रदर्शित झाला होता ज्यांच्या पूर्ण होण्यास विलंब झाल्यामुळे तिला करारबद्ध करण्यात आले होते. ही तमिळ सिनेमातील अशी पहिली भूमिका होती.[१२]
रवि वर्मनचा मॉस्कोविन कावेरी (2010) हा तिचा पुढचा चित्रपट होता, मूळत: तिने काम सुरू केलेला हा पहिला चित्रपट होता. या चित्रपटाने समीक्षकांकडून खराब पुनरावलोकने मिळविली, तरीही समंथाच्या कामगिरीला चित्रपटातील एकमेव ठळक वैशिष्ट्य म्हणून श्रेय देण्यात आले.[१३]
समंथाने नंतर तेलुगु चित्रपट वृंदावनम (२०१०) मध्ये काम केले, ज्यामध्ये तिची एनटीआर जूनियर आणि काजल अग्रवाल यांच्यासोबत सहाय्यक भूमिका होती. इंदूच्या भूमिकेला तिच्या मागील चित्रपटांपेक्षा कमी स्क्रीन वेळ असूनही तिला चांगला प्रतिसाद मिळाला आणि हा चित्रपट तिचा तेलगूमधील दुसरा यशस्वी चित्रपट ठरला.[१४]
संदर्भ
- ^ richa. "Actor turned entrepreneur Samantha Akkineni's net worth will make you green with envy". Asianet News Network Pvt Ltd (इंग्रजी भाषेत). 2022-01-10 रोजी पाहिले.
- ^ "Samantha Ruth Prabhu And Naga Chaitanya Announce Separation". NDTV.com. 2022-01-10 रोजी पाहिले.
- ^ Chowdhary, Y. Sunita (2012-05-10). "Away from the rat race" (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X.
- ^ "Meet Samantha: South's hottest heroine-Entertainment News , Firstpost". Firstpost (इंग्रजी भाषेत). 2014-08-13. 2022-02-09 रोजी पाहिले.
- ^ Chowdhary, Y. Sunita (2010-03-01). "Poised on the edge" (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X.
- ^ "It wasn't a liplock really: Samantha - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-02-09 रोजी पाहिले.
- ^ "Interview with Samantha". web.archive.org. 2015-11-17. रोजी मूळ पानापासून संग्रहित2015-11-17. 2022-02-09 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "संग्रहित प्रत". web.archive.org. रोजी मूळ पानापासून संग्रहित2014-11-05. 2022-02-09 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "Movie Review:Ye Maaya Chesave". web.archive.org. 2010-03-02. रोजी मूळ पानापासून संग्रहित2010-03-02. 2022-02-09 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "Samantha feels 'One' film changes all - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-02-09 रोजी पाहिले.
- ^ subramanian, anupama (2014-03-28). "Samantha is in her own league". Deccan Chronicle (इंग्रजी भाषेत). 2022-02-09 रोजी पाहिले.
- ^ "Tamil Cinema News | Tamil Movie Reviews | Tamil Movie Trailers - IndiaGlitz Tamil". IndiaGlitz.com. 2014-08-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-02-09 रोजी पाहिले.
- ^ Srinivasan, Pavithra. "Moscowin Kaveri is beautiful nonsense". Rediff (इंग्रजी भाषेत). 2022-02-09 रोजी पाहिले.
- ^ "Brindavanam | Junior NTR | Creates Waves | Box Office - Oneindia Entertainment". web.archive.org. 2010-12-08. 2010-12-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-02-09 रोजी पाहिले.