Jump to content

सप्त चिरंजीव

भारतीय प्राचीन ग्रंथांमध्ये पुढील सात पौराणिक व्यक्ती चिरंजीव मानल्या गेल्या आहेत. यांनाच सप्तचिरंजीव असे म्हणले जाते.[]

  1. अश्वत्थामा
  2. बली
  3. व्यास ऋषी
  4. हनुमान
  5. विभीषण
  6. कृपाचार्य
  7. परशुराम

प्रातःस्मरणाचा एक श्लोक

या श्लोकात सप्तचिरंजीवांची नावे आली आहेत.

अश्वत्थामा बलिर्व्यासः हनूमांश्च बिभीषणः।

कृपः परशुरामश्चैव सप्तेते चिरंजीविनः॥

अर्थ: अश्वत्थामा, बली, व्यासऋषी, हनुमान, बिभीषण, कृपाचार्य, परशुराम हे सप्तचिरंजीव आहेत.

मार्कंडेय

काही प्राचीन ग्रंथांत मार्कंडेय ऋषी हे दीर्घायुषी असल्याचे म्हणले आहे, मात्र ते चिरंजीव म्हणजे अमर नसल्याने त्याचे नाव वरील श्लोकात नाही. मार्कंडेय ऋषींना वयाच्या सोळाव्या वर्षी येणाऱ्या अपमृत्यू वर विजय मिळवला आणि दीर्घायुष्य प्राप्त केले होते. त्यामुळे त्यांच्यासाठी एक वेगळा श्लोक आहे.

अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः।
कृपः परशुरमश्च सप्तैते चिरंजीविनः॥
सप्तैतान् स्मरेन्नित्यम् मार्कंडेयमथाष्टमम्।
जीवेद्‌वर्षशतं सोऽपि सर्वव्याधिविवर्जितः॥

वरील ओळींचा अर्थ असा होतो की या ८ अमरांचे (अश्वत्थामा, राजा महाबली, वेदव्यास, हनुमान, विभीषण, कृपाचार्य, परशुराम आणि ऋषी मार्कंडेय) दररोज स्मरण केल्याने माणूस सर्व आजारांपासून मुक्त होऊ शकतो आणि १०० वर्षांहून अधिक जगू शकतो.

  1. ^ "सप्तचिरंजीव". vishwakosh.marathi.gov.in. ३० जानेवारी २०२२ रोजी पाहिले.