सप्तर्षी
सप्तर्षी म्हणजे हे हिंदू पौराणिक कथा आणि वेद यांत उल्लेखलेले सात प्रमुख ऋषी. सप्तर्षींच्या नावांबाबत पुराणांत मतभेद आहेत. आकाशात सध्या जे सप्तर्षी नावाचे सात तारे दिसतात त्यांची नावे - अकारविल्हे :
- अंगिरस (Epsilon of Ursa Major)
- अत्रि (Delta Ursae Majoris)
- क्रतु (Dubhe; Alpha of Ursae Majoris)
- पुलस्त्य (Gamma Ursae Majoris)
- पुलह (Merak; Beta Ursae Mejoris)
- मरीचि (Alkaid; Benetnasch; Eta Ursae Majoris)
- वसिष्ठ (Mizar; Zeta Ursae Majoris).
वसिष्ठ ताऱ्याजवळ अरुंधतीचा तारा (Alcor) असतो.
सप्तर्षींमधील ताऱ्यांचा आकाशातला (घड्याळ्याच्या काट्याच्या फिरण्याच्या दिशेनुसार-clockwise-सव्य)क्रम (α) क्रतु (β) पुलह (γ) पुलस्त्य (δ) अत्रि (ε) अंगिरस) (ζ) वसिष्ठ (शेजारी अरुंधती) आणि (η) मरीचि असा आहे.
- मन्वंतरे आणि त्यांतील सप्तर्षी
- स्वायंभुव मन्वंतर : अंगिरस्(भृगु), अत्रि, क्रतु, पुलस्त्य, पुलह, मरीचि, वसिष्ठ.
- स्वारोचिष मन्वंतर : और्व, कश्यप, अत्रि, निश्च्यवन, प्राण, अग्नि, स्तंब.
- उत्तम मन्वंतर : अनघ, ऊर्ध्वबाहु, गात्र, रज, शुक्ल, सचन, सुतपस्.
- तामस मन्वंतर : अकपि, अग्नि, कपि, काव्य, चैत्र(जन्हु), ज्योतिर्धर्मन्, धातृ, पृथु.
- रैवत मन्वंतर : ऊर्धबाहु(सोमप), देवबाहु, पर्जन्य, वसिष्ठ, यदुघ्र, वेदशिरस्, हिरण्यरोमन्.
- चाक्षुष मन्वंतर : अतिनामन्, भृगु, मधु, विरजस्, हविष्मत्, सहिष्णु, सुधामन्, सुमेधस्.
- वैवस्वत मन्वंतर : अत्रि, कश्यप, गौतम, जमदग्नि, भारद्वाज, वसिष्ठ, विश्वामित्र.
या मन्वंतरानंतर सावर्णि, दक्षसावर्णि, ब्रह्मसावर्णि, धर्मसावर्णि, रुद्रसावर्णि, रौच्य(देवसावर्णि) आणि भौत्य(इंद्रसावर्णि) अशी आणखी सात मन्वंतरे अजून सुरू व्हावयाची आहेत. त्यांचे सप्तर्षी अर्थात वेगळेच असतील.
सप्तर्षी | |
---|---|
अत्री • भारद्वाज •गौतम • जमदग्नी • कश्यप • वसिष्ठ • विश्वामित्र |