सप्टेंबर ६
साचा:सप्टेंबर२०२४
सप्टेंबर ६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २४९ वा किंवा लीप वर्षात २५० वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
दहावे शतक
- ९५२ - सम्राट सुझाकु, जपानी सम्राट.
सोळावे शतक
- १५२२ - फर्डिनांड मॅगेलनच्या मोहिमेतील व्हिक्टोरिया हे जगप्रदक्षिणा करणारे पहिले जहाज स्पेनला पोचले.
सतरावे शतक
- १६२० - प्लिमथ, इंग्लंड येथून मेफ्लॉवर जहाजाचा प्रवास सुरू झाला.
अठरावे शतक
- १७७६ - ग्वादालूप बेटावर चक्रीवादळ, ६,००० ठार.
एकोणिसावे शतक
- १८८८ - चार्ल्स टर्नरने एकाच मोसमात २५० क्रिकेट बळी घेण्याचा विक्रम रचला.
विसावे शतक
- १९०१ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅककिन्लीवर खूनी हल्ला.
- १९३० - लश्करी उठावात आर्जेन्टिनाच्या राष्ट्राध्यक्ष हिपोलितो इरिगोयेनची उचलबांगडी.
- १९३९ - दक्षिण आफ्रिकेने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
- १९४० - बल्गेरियाच्या राजा कॅरोल दुसऱ्याने पदत्याग केला. त्याचा मुलगा मायकेल सत्तेवर.
- १९४९ - कॅम्डेन, न्यू जर्सीमध्ये हॉवर्ड अन्रुहने १३ शेजाऱ्यांची गोळ्या घालून हत्या केली.
- १९६५ - भारत-पाकिस्तान दुसरे युद्ध-भारताने पाकिस्तानवर हल्ला केला.
- १९६६ - दक्षिण आफ्रिकेच्या पंतप्रधान हेन्ड्रिक व्हेरवोर्डची संसदेत भोसकून हत्या.
- १९६८ - स्वाझीलँडला स्वातंत्र्य.
- १९७० - पॅलेस्टाईनच्या अतिरेक्यांनी युरोपमधून न्यू यॉर्कला निघालेल्या दोन विमानांचे अपहरण केले व जॉर्डनला नेली.
- १९८५ - मिडवेस्ट एक्सप्रेस एरलाइन्स फ्लाइट १०५ हे डग्लस डी.सी.-९ प्रकारचे विमान मिलवॉकीहून उड्डाण करताच कोसळले. ३१ ठार.
- १९८६ - अबु निदालच्या हस्तकांनी नेव्हे शालोम येथे सिनॅगॉगवर हल्ला चढवून २२ लोकांना ठार मारले.
एकविसावे शतक
जन्म
- १६६६ - आयव्हन पाचवा, रशियाचा झार.
- १७६६ - जॉन डाल्टन, ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ.
- १८९२ - सर एडवर्ड ऍपलटन, नोबेल पारितोषिक विजेता ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ.
- १९०६ - लुइस फेदेरिको लेलवा, नोबेल पारितोषिक विजेता आर्जेन्टीनाचा भौतिकशास्त्रज्ञ.
- १९२३ - पीटर दुसरा, युगोस्लाव्हियाचा राजा.
- १९२९ - यश जोहर, भारतीय चित्रपट निर्माता.
- १९५४ - कार्ली फियोरिना, अमेरिकन उद्योगपती.
- १९५७ - होजे सॉक्रेटिस, पोर्तुगालचा पंतप्रधान.
- १९७१ - देवांग गांधी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- ९७२ - पोप जॉन तेरावा.
- १९३८ - सली प्रुडहॉम, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच लेखक.
- १९६६ - हेन्ड्रिक व्हेरवोर्ड, दक्षिण आफ्रिकेचा पंतप्रधान.
- १९९० - लेन हटन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- २००७ - लुसियानो पाव्हारॉटी, इटालियन ऑपेरा गायक.
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर सप्टेंबर ६ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
सप्टेंबर ४ - सप्टेंबर ५ - सप्टेंबर ६ - सप्टेंबर ७ - सप्टेंबर ८ - सप्टेंबर महिना