सप्टेंबर २६
साचा:सप्टेंबर२०२४
सप्टेंबर २६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २६९ वा किंवा लीप वर्षात २७० वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
सतरावे शतक
- १६८७ - व्हेनिस आणि ऑट्टोमन साम्राज्यातील लढाईत अथेन्समधील पार्थेनॉनचा मोठा भाग ढासळला.
अठरावे शतक
- १७७७ - अमेरिकन क्रांती - ब्रिटिश सैनिक फिलाडेल्फिया शहरात घुसले.
विसावे शतक
- १९३४ - आर.एम.एस. क्वीन मेरी या नौकेचे जलावतरण.
- १९५० - संयुक्त राष्ट्रांच्या सैन्याने सोल उत्तर कोरियाकडून परत जिंकून घेतले.
- १९५० - इंडोनेशियाला संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
- १९५४ - जपानमध्ये तोया मारू ही फेरी वादळात बुडाली. १,१७२ मृत्युमुखी.
- १९९७ - गरुडा इंडोनेशिया या विमानकंपनीचे एरबस ए-३०० प्रकारचे विमान मेदान शहराजवळ कोसळले. २३४ ठार.
एकविसावे शतक
- २००० - ग्रीसजवळ एम.एस. एक्सप्रेस समिना ही फेरी बुडाली. ८० मृत्युमुखी.
- २००१ - 'सकाळ' वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संपादक - संचालक प्रताप पवार यांची इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड.
- २००२ - गांबियाजवळ क्षमतेपेक्षा जास्त भरलेली एम.व्ही. जूला ही फेरी बुडाली. १,००० पेक्षा अधिक मृत्युमुखी.
- २००९ - टायफून केत्साना या चक्रीवादळाच्या तडाख्यात फिलिपाईन्स, चीन, व्हियेतनाम, कंबोडिया, लाओस आणि थायलंडमध्ये ७०० मृत्युमुखी.
जन्म
- १८२० - ईश्वरचंद्र विद्यासागर, भारतीय समाजसुधारक.
- १८७० - क्रिस्चियन दहावा, डेन्मार्कचा राजा.
- १८९४ - आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर, भारतीय गांधीवादी तत्त्वचिंतक.
- १८९७ - पोप पॉल सहावा.
- १९२३ - देव आनंद, भारतीय, हिंदी चित्रपट अभिनेता, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक.
- १९३१ - विजय मांजरेकर, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९३२ - मनमोहन सिंग, भारतीय पंतप्रधान.
- १९३५ - बॉब बार्बर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९४३ - इयान चॅपल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९७१ - पॅटरसन थॉम्पसन, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९७२ - मार्क हॅस्लाम, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९८१ - सेरेना विल्यम्स, अमेरिकन टेनिस खेळाडू.
मृत्यू
- १७६३ - जॉन बायरन, इंग्लिश कवी.
- १९०२ - लेव्ही स्ट्रॉस, अमेरिकन उद्योगपती.
- १९५२ - जॉर्ज सांतायाना, स्पॅनिश तत्त्वज्ञानी.
- १९५६ - लक्ष्मणराव किर्लोस्कर, भारतीय, मराठी उद्योगपती.
- १९७७ - उदय शंकर, भारतीय नर्तक.
- १९८८ - शिवरामबुवा दिवेकर, गायक.
- १९९६ - विद्याधर गोखले, मराठी नाटककार, पत्रकार.
- २००२ - राम फाटक, मराठी संगीतकार, गायक.
- २००८ - पॉल न्यूमन, अमेरिकन अभिनेता.
प्रतिवार्षिक पालन
- कर्णबधिर दिन.
- युरोपीय भाषा दिन.
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर सप्टेंबर २६ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
सप्टेंबर २४ - सप्टेंबर २५ - सप्टेंबर २६ - सप्टेंबर २७ - सप्टेंबर २८ - सप्टेंबर महिना