सप्टेंबर २१
साचा:सप्टेंबर२०२४
सप्टेंबर २१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २६४ वा किंवा लीप वर्षात २६५ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
अठरावे शतक
एकोणिसावे शतक
- १८२७ - जोसेफ स्मिथ जुनियरच्या म्हणण्यानुसार मोरोनी या दैवी शक्तीने त्याला सोन्याच्या पत्र्यावर लिहीलेली मॉर्मोनपंथाची कथा दिली.
- १८९६ - होरेशियो किचनरने सुदानमधील डोंगोला शहर जिंकले.
विसावे शतक
- १९२१ - जर्मनीतील ऑप्पाउ शहरातील खत कारखान्यात स्फोट, ५-६०० ठार.
- १९३४ - सुपर टायफून मुरोतोने जपानच्या ओसाका शहरात धुमाकूळ घातला. ३,०६० ठार.
- १९३८ - १९३८ चे हरिकेन न्यू योर्क शहरात आले. ५००-७०० ठार.
- १९३९ - रोमेनियाच्या पंतप्रधान आर्मांड कॅलिनेस्कुची हत्या.
- १९४२ - ज्यूंचे शिरकाण - युक्रेनच्या दुनैव्त्सि शहरात नाझींनी २,५८८ ज्यूंची हत्या केली.
- १९६४ - माल्टाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९६५ - सिंगापूरला संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.
- १९७२ - फिलिपाईन्समध्ये लश्करी कायदा लागू.
- १९८१ - बेलिझला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९८१ - सांड्रा डे ओ'कॉनॉरची अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नेमणूक.
- १९९१ - आर्मेनियाला सोवियेत संघापासून स्वातंत्र्य.
- १९९५ - भारतात अनेक व्यक्तिंनी दावा केला की गणपतीच्या मूर्तीसमोर दूध ठेवले असता त्याने ते दूध प्यायले.
- १९९९ - तैवानमध्ये भूकंप. २,४०० ठार.
एकविसावे शतक
- २००१ - तुलू, फ्रांसमधील रसायन कारखान्यात स्फोट. २९ ठार.
- २००३ - गॅलेलियो या अंतराळयानाने मुद्दामहून गुरूच्या वातावरणात प्रवेश केला. अत्यंत दाबामुळे यान नाश पावले.
- २०१३ - केन्याच्या नैरोबी शहरात मुस्लिम दहशतवाद्यांनी वेस्टगेट मॉलवर हल्ला करून ७२ पेक्षा अधिक लोकांना ठार केले. सुमारे १७५ जखमी.
जन्म
- १३२८ - हाँग्वू, चीनी सम्राट.
- १४१५ - फ्रेडरिक तिसरा, पवित्र रोमन सम्राट.
- १४२८ - जिंग्टाइ, चीनी सम्राट.
- १७५६ - जॉन मॅकऍडम, स्कॉटिश रस्ता-तंत्रज्ञ.
- १८४० - मुराद पाचवा, ऑट्टोमन सम्राट.
- १८४२ - दुसरा अब्दुल हमीद, ओस्मानी सम्राट.
- १८६६ - एच.जी. वेल्स, अमेरिकन लेखक.
- १९०२ - लियरी कॉन्सन्टाईन, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९३२ - पंडित जितेंद्र अभिषेकी, भारतीय-मराठी गायक, मराठी संगीतकार.
- १९४७ - स्टीवन किंग, अमेरिकन लेखक.
- १९५० - बिल मरे, अमेरिकन अभिनेता.
- १९५१ - अस्लान माश्काडोव्ह, चेचेन क्रांतीकारी.
- १९५९ - रिचर्ड एलिसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९६३ - कर्टली ऍम्ब्रोस, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९७१ - जॉन क्रॉली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७१ - ऍडम हकल, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
- १९७९ - क्रिस गेल, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९८० - करीना कपूर, भारतीय अभिनेत्री.
मृत्यू
- इ.स.पू. १९ - व्हर्जिल, रोमन कवि.
- १३२७ - एडवर्ड तिसरा, इंग्लंडचा राजा.
- १५५८ - चार्ल्स पाचवा, पवित्र रोमन सम्राट.
- १७४३ - सवाई जयसिंह, जयपूर संस्थानाचा राजा.
- १९३९ - आर्मांड कॅलिनेस्कु, रोमेनियाचा पंतप्रधान.
- १९५७ - हाकोन सातवा, नॉर्वेचा राजा.
- १९९८ - फ्लोरेंस ग्रिफिथ जॉयनर, अमेरिकन धावपटू.
- १९९९ - पुरुषोत्तम दारव्हेकर, मराठी नाटककार, मराठी नाट्यदिग्दर्शक.
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर सप्टेंबर २१ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
सप्टेंबर १९ - सप्टेंबर २० - सप्टेंबर २१ - सप्टेंबर २२ - सप्टेंबर २३ - सप्टेंबर महिना