सप्टेंबर २०
साचा:सप्टेंबर२०२४
सप्टेंबर २० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २६३ वा किंवा लीप वर्षात २६४ वा दिवस असतो.
२६ ऑगस्ट
ठळक घटना आणि घडामोडी
बारावे शतक
- ११८७ - सलाद्दीनने जेरुसलेमला वेढा घातला.
सतरावे शतक
- १६३३ - पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्याचे प्रतिपादन केल्या बद्दल गॅलेलियोवर खटला चालवण्यात आला.
- १६९७ - रीसवीकचा तह.
अठरावे शतक
एकोणिसावे शतक
- १८५४ - अल्माची लढाई - फ्रांस आणि ब्रिटिश सैन्यांनी रशियाला हरवले.
- १८५७ - १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध - ब्रिटिश फौजेने दिल्ली परत घेतले.
- १८८१ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जेम्स गारफील्डच्या हत्येनंतर चेस्टर ए. आर्थर राष्ट्राध्यक्षपदी.
विसावे शतक
- १९४२ - ज्यूंचे शिरकाण - जर्मन एस.एस.ने ३,००० ज्यूंची कत्तल केली.
- १९७० - सिरियाने जॉर्डनवर चाल केली.
- १९७६ - टर्किश एरलाइन्सचे बोईंग ७२७ प्रकारचे विमान तुर्कस्तानच्या टॉरस माउंटनमध्ये कोसळले. १५५ ठार.
- १९७७ - व्हियेतनामला संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.
- १९७९ - मध्य आफ्रिकेच्या साम्राज्यात लश्करी उठाव. सम्राट बोकासा पहिला पदच्युत.
- १९८४ - बैरुतच्या अमेरिकन वकिलातीवर आत्मघातकी हल्ला. २२ ठार.
- १९९० - दक्षिण ऑसेटियाने स्वतःला जॉर्जियापासून स्वतंत्र घोषित केले.
एकविसावे शतक
- २००१ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यु. बुशने दहशतीविरुद्ध युद्ध पुकारले.
- २००४ - एज्युसॅट या उपग्रहाचे श्रीहरिकोटा येथील तळावरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
जन्म
- १८५३ - राम पाचवा तथा चुलालोंगकोर्ण, थायलंडचा राजा.
- १८६१ - वॉल्टर ग्रिफेन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १८९७ - नारायण भिकाजी परुळेकर ऊर्फ नानासाहेब परुळेकर, मराठी पत्रकार.
- १९२१ - पनानमल पंजाबी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९२२ - द. न. गोखले, चरित्र वाङ्मयाचे संशोधक व मराठी शुद्धलेखनाचे ज्येष्ठ अभ्यासक.
- १९२५ - राम सातवा तथा आनंद माहिडोल, थायलंडचा राजा.
- १९३४ - सोफिया लॉरेन, इटालियन अभिनेत्री.
- १९५१ - स्टीवन ब्रूक, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९४४ - रमेश सक्सेना, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९६३ - अनिल दलपत, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९६८ - इजाझ अहमद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९७३ - नवीद नवाझ, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- १३८४ - लुई पहिला, नेपल्सचा राजा.
- १९३३ - ऍनी बेझंट, ब्रिटिश, भारतीय समाजसुधारिका.
- १९२८ - नारायण गुरु, केरळमधील समाजसुधारक .
प्रतिवार्षिक पालन
- राष्ट्रीय युवक दिन - थायलंड
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर सप्टेंबर २० च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
सप्टेंबर १८ - सप्टेंबर १९ - सप्टेंबर २० - सप्टेंबर २१ - सप्टेंबर २२ - सप्टेंबर महिना