सप्टेंबर १५
साचा:सप्टेंबर२०२४
सप्टेंबर १५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २५८ वा किंवा लीप वर्षात २५९ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
- एकोणिसावे शतक
- १८१२ - नेपोलियन बोनापार्टच्या नेतृत्वाखाली फ्रेंच सैन्य मॉस्कोमधील क्रेमलिनला येऊन थडकले.
- १८२० - पोर्तुगालच्या लिस्बन शहरात उठाव.
- १८२१ - ग्वातेमाला, एल साल्वादोर, हॉन्डुरास, निकाराग्वा आणि कोस्टा रिका या देशांनी स्पेनपासून आपण स्वतंत्र असल्याचे जाहीर केले.
- १८३० - लिव्हरपूल आणि मँचेस्टर शहरांमधील रेल्वेसेवा सुरू.
- १८३१ - न्यू जर्सीमधील कॅम्डन अँड अँबोय रेलरोड या शहरांमधील लोहमार्गावरून जॉन बुल या रेल्वे इंजिनाची सर्वप्रथम धाव.
- १८३५ - चार्ल्स डार्विन एच.एम.एस. बीगल या जहाजातून गॅलापागोस द्वीपांत पोचला.
- १८६२ - अमेरिकन यादवी युद्ध - दक्षिणेच्या सैन्याने हार्पर्स फेरी, व्हर्जिनिया हे शहर काबीज केले.
- १८७३ - फ्रान्स-प्रशियन युद्ध - फ्रान्सने खंडणीचा शेवटचा हप्ता चुकता केल्यावर जर्मन सैन्याच्या शेवटच्या तुकडीने फ्रान्स सोडले.
- १८९४ - पहिले चीन-जपान युद्ध - प्याँगयांगच्या लढाईत जपानने चीनला हरवले.
- विसावे शतक
- १९१६ - पहिले महायुद्ध-सॉमची लढाई - सगळ्यात पहिल्यांदा लढाईत रणगाड्यांचा वापर केला गेला.
- १९३५ - जर्मनीने देशातील ज्यू व्यक्तींचे नागरिकत्व रद्द केले.
- १९३५ - जर्मनी स्वस्तिक असलेला ध्वज आपला राष्ट्रध्वज म्हणून अंगीकारला.
- १९४० - दुसरे महायुद्ध-बॅटल ऑफ ब्रिटन - लढाईच्या चरमसीमेवर रॉयल एर फोर्सने लुफ्तवाफेची असंख्य विमाने पाडली.
- १९४२ - दुसरे महायुद्ध - [ग्वादालकॅनाल]]जवळ अमेरिकेच्या यू.एस.एस. वास्प या विमानवाहू नौकेवर टॉरपेडोहल्ला.
- १९४४ - दुसरे महायुद्ध-पेलेल्यूची लढाई.
- १९४५ - फ्लॉरिडामध्ये मोठे हरिकेन किनाऱ्यावर येउन ३६६ विमाने व २५ ब्लिंप नष्ट झाली.
- १९४७ - आर.सी.ए. कंपनीने १२एक्स७ निर्वात नळीचे उत्पादन सुरू केले.
- १९४७ - जपानला टायफून कॅथलीन या मोठ्या वादळाचा तडाखा. १,०७७ ठार.
- १९४८ - एफ-८६ सेबरजेट प्रकारच्या विमानाने ताशी १,०८० किमीची गती गाठून उच्चांक नोंदवला.
- १९५० - कोरियन युद्ध - अमेरिकेचे सैन्य इंचॉन येथे उतरले.
- १९५२ - संयुक्त राष्ट्रांनी एरिट्रिया इथियोपियाच्या हवाली केले.
- १९५८ - सेंट्रल रेलरोड ऑफ न्यू जर्सी कंपनीच्या लोकल गाडीला अपघात होऊन ५८ ठार.
- १९५९ - निकिता ख्रुश्चेव सोवियेत संघाचा अमेरिकेला भेट देणारा पहिला नेता झाला.
- १९६८ - सोवियेत संघाच्या झाँड ५ या अंतराळयानाचे प्रक्षेपण.
- १९७२ - स्कँडिनेव्हियन एरलाइन्स सिस्टमच्या ग्यॉटेबर्गहून स्टॉकहोमला जाणाऱ्या विमानाचे अपहरण.
- १९७४ - आर व्हियेतनाम फ्लाइट ७२७ या विमानाचे अपहरण. त्यानंतर उतरताना विमान कोसळले. ७५ ठार.
- १९८१ - सांड्रा डे ओ'कॉनोर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सर्वप्रथम महिला, न्यायाधीश झाली.
- १९८१ - व्हानुआतुला संयुक्त राष्ट्रांचे सदस्यत्व मिळाले.
- १९९८ - एम.सी.आय. कम्युनिकेशन्स आणि वर्ल्डकॉम या कंपनीचे एकत्रीकरण.
- एकविसावे शतक
- २००८ - लेहमान ब्रदर्स या कंपनीने दिवाळे काढले.
- २०१३ - नीना दावुलुरी पहिली भारतीय वंशाची मिस अमेरिका झाली.
जन्म
- ९७३ - अल बिरुनी, अरबी गणितज्ञ.
- १२५४ - मार्को पोलो, इटालियन फिरस्ता.
- १८३० - पोर्फिरियो दियाझ, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.
- १८५७ - विल्यम हॉवर्ड टाफ्ट, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
- १८६० - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया, भारतीय अभियंता.
- १८७६ - शरदचंद्र चट्टोपाध्याय, बंगाली साहित्यिक.
- १८७९ - जोसेफ ल्योन्स, ऑस्ट्रेलियाचा १०वा पंतप्रधान.
- १८८१ - एत्तोरे बुगाटी, इटालियन अभियंता.
- १८८७ - कार्लोस दाविला, चिलीचा राष्ट्राध्यक्ष.
- १९०४ - उंबेर्तो दुसरा, इटलीचा राजा.
- १९०९ - सी.एन. अण्णादुराई, तामीळनाडूचे मुख्यमंत्री.
- १९३७ - फर्नान्डो दिला रुआ, आर्जेन्टिनाचा ५१वा राष्ट्राध्यक्ष.
- १९४६ - टॉमी ली जोन्स, अमेरिकन चित्रपट अभिनेता.
- १९४६ - ऑलिव्हर स्टोन, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक.
- १९६४ - रॉबर्ट फायको, स्लोव्हेकियाचे पंतप्रधान.
- १९७१ - नेथन ॲसल, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९८९ - चेतन रामलू, न्यू झीलँडचा संगीतकार.
मृत्यू
- ६६८ - कॉन्स्टान्स दुसरा, बायझेन्टाइन सम्राट.
- १८५९ - इझाम्बार्ड किंग्डम ब्रुनेल, ब्रिटिश अभियंता.
- १९७३ - गुस्ताफ सहावा ॲडॉल्फ, स्वीडनचा राजा.
प्रतिवार्षिक पालन
भारतात मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा जन्मदिवस हा अभियंता दिन म्हणून पाळला जातो.
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर सप्टेंबर १५ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
सप्टेंबर १३ - सप्टेंबर १४ - सप्टेंबर १५ - सप्टेंबर १६ - सप्टेंबर १७ - सप्टेंबर महिना