सप्टेंबर १
साचा:सप्टेंबर२०२४
सप्टेंबर १ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २४४ वा किंवा लीप वर्षात २४५ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
इ.स.पूर्व छप्पन्नावे शतक
- ५५०९ - बायझेन्टाईन साम्राज्यातील समजाप्रमाणे या दिवशी सृष्टीची रचना झाली.
अठरावे शतक
- १७१५ - फ्रांसचा राजा लुई चौदावा ७२वर्षांच्या राज्यकारभारानंतर मृत्यू पावला. त्याचा राज्यकाल कोणत्याही युरोपीय राज्यकर्त्यापेक्षा जास्त होता.
एकोणिसावे शतक
- १८६२ - अमेरिकन यादवी युद्ध-उत्तरेच्या जनरल विल्यम टी. शेर्मनने घातलेल्या चार महिन्यांच्या वेढ्याला कंटाळून जनरल जॉन बेल हूडने अटलांटातून पळ काढला.
- १८९४ - हिंकली, मिनेसोटाजवळ लागलेल्या वणव्यात ४००पेक्षा अधिक मृत्युमुखी.
- १८९७ - बॉस्टन सबवेचे उद्घाटन.
विसावे शतक
- १९०५ - आल्बर्टा आणि सास्काचेवान कॅनडामध्ये दाखल.
- १९१४ - सेंट पीटर्सबर्गचे नाव बदलून पेट्रोग्राड करण्यात आले.
- १९२३ - टोक्यो आणि योकोहामा परिसरात भूकंप १,०५,००० ठार.
- १९३९ - दुसरे महायुद्ध - जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले व युद्धास तोंड फुटले.
- १९६४ - इंडियन ऑइल रिफायनरीझ आणि इंडियन ऑइल कंपनी यांनी एकत्र येउन इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ही कंपनी स्थापली.
- १९६९ - लिब्यात कर्नल मुअम्मर गद्दाफीने सत्ता बळकावली.
- १९७२ - रेक्याविकमध्ये बॉबी फिशरने बोरिस स्पास्कीला हरवून बुद्धिबळाचे जगज्जेतेपद मिळवले.
- १९७४ - एस.आर.-७१ ब्लॅकबर्ड प्रकारच्या विमानाने न्यू यॉर्क ते लंडन अंतर एक तास ५४ मिनिटे व ५६.४ सेकंदात तोडून जागतिक विक्रम स्थापला.
- १९७९ - पायोनियर ११ हे अंतराळयान शनीपासून २१,००० किमी अंतरावरून गेले.
- १९८३ - शीत युद्ध - कोरियन एर फ्लाइट ००७ हे बोईंग ७४७ प्रकारचे विमान सोवियेत हद्दीत घुसल्याने सोवियेत संघाच्या लढाऊ विमानांनी तोडून पाडले. २६९ ठार.
- १९९१ - उझबेकिस्तानने रशियापासून स्वातंत्र्य जाहीर केले.
एकविसावे शतक
जन्म
- १८७५ - एडगर राइस बरोज, अमेरिकन लेखक.
- १८९६ - ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, वैष्णव तत्त्वज्ञानी, हरे कृष्ण पंथाचे स्थापक.
- १९०६ - होआकिन बॅलाग्वेर, डॉमिनिकन प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष.
- १९२१ - माधव मंत्री, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९२६ - अब्दुर रहमान बिश्वास, बांगलादेशचा राष्ट्राध्यक्ष.
- १९४६ - रोह मू-ह्युन, दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९४९ - पी.ए. संगमा, भारतीय राजकारणी.
- १९५१ - डेव्हिड बेरस्टो, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९६८ - मोहम्मद अट्टा, सप्टेंबर ११, २००१ च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार.
- १९७६ - क्लेर कॉनोर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९९७ - जॉन जंगकुक,बीटीएस बँडचा गायक.
मृत्यू
- १०६७ - बाल्ड्विन पाचवा, फ्लँडर्सचा राजा.
- ११५९ - पोप एड्रियान चौथा.
- १२५६ - कुजो योरित्सुने, जपानी शोगन.
- १५७४ - गुरू अमरदास, तिसरे शीख गुरू.
- १५८१ - गुरू रामदास, चौथे शीख गुरू.
- १७१५ - लुई चौदावा, फ्रांसचा राजा.
प्रतिवार्षिक पालन
- क्रांती दिन - लिब्या.
- ज्ञान दिन - रशिया.
- शिक्षक दिन - सिंगापुर.
- संविधान दिन - स्लोव्हेकिया.
- स्वातंत्र्य दिन - उझबेकिस्तान.
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर सप्टेंबर १ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
ऑगस्ट ३० - ऑगस्ट ३१ - सप्टेंबर १ - सप्टेंबर २ - सप्टेंबर ३ - सप्टेंबर महिना