Jump to content

सदागोपान रमेश

सदागोपान रमेश (रोमन लिपी: Sadagoppan Ramesh ;) (ऑक्टोबर १६, इ.स. १९७५; चेन्नई, तमिळनाडू - हयात) हा भारतीय राष्ट्रीय पुरुष क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. तो प्रामुख्याने डाव्या हाताने खेळणारा फलंदाज म्हणून ओळखला जातो. फलंदाजीसोबत तो उजव्या हाताने लेगब्रेक गोलंदाजीदेखील करतो. एकदिवसीय सामन्यांच्या कारकिर्दीतील पहिल्या चेंडूवर बळी मिळवण्याचा विक्रम करणारा तो एकमेव भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध झालेल्या सामन्यात निक्सन मॅक्लीन याचा बळी घेऊन त्याने हा विक्रम नोंदवला.

बाह्य दुवे


भारतचा ध्वज भारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
भारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.