सदर (उत्सव)
सदर (సదర్) हा एक आहे पाण म्हशींसाठी भरवलेली जत्रा आहे. ही जत्रा दरवर्षी भरवली जाते. हैदराबाद, तेलंगणा, भारत येथील यादव समुदायाद्वारे ही जत्रा दिवाळीचा भाग म्हणून साजरी केली जाते.[१][२] याला तेलुगु भाषेत डन्नापोथुला पांडुगा (దున్నపోతుల పండుగ) म्हणून ओळखले जाते. दिवाळीनंतरच्या दुसऱ्या दिवशी हा दिवस साजरा केला जातो.
म्हशींना फुलांच्या माळांनी सजविले जाते. त्यांची शिंगे रंगविली जातात आणि रस्त्यावरून त्यांची वरात काढली जाते. वरातीत तिन मार या चित्रपटातील गाण्याचा वापर केला जातो. हे गाणे विशेष यादव बँड (दा दानीकी) यावर आढाईत आहे.[१] म्हशींना कधीकधी त्यांच्या मागील पाय वर उभे राहण्यास प्रोत्साहित केले जाते.
'सदर' ची सुरुवात स्वर्गीय श्री सालंद्री न्यायम चौधरी मल्ल्याया यादव यांनी १९४६ मध्ये नारायणगुडा वाईएमसीए, हैदराबाद येथे केली.[३] कालांतराने हैदराबादच्या इतर अनेक ठिकाणी त्यांच्या संबंधित चौधरीने सदर या उत्सवाचे आयोजन केले. नारायणगुडा वाईएमसीए सदर (रेड्डी महिला महाविद्यालयाजवळ) त्याच्या इतिहास आणि लोकप्रियतेमुळे सर्वात जास्त गर्दी आकर्षित करते. त्याला पेधा सदर म्हणून अंबोधले जाते. नारायणगुडा वाईएमसीए सदर १९४६ पासून आजपर्यंत या संस्थेचे संस्थापक दरवर्षी अखंडपणे आयोजन करत आहेत. यात दिवंगत श्री सालंद्री न्यायम चौधरी मल्ल्याया यादव आणि नंतर त्याच्या कुटुंबातील सदस्यांचा मोठा वाटा आहे.[४]
दीपक टॉकीज, सैदाबाद, अमीरपेट आणि खैरताबाद ही सदर आयोजित केली जाणारी इतर उल्लेखनीय ठिकाणे आहेत. सदरच्या लोकप्रियतेमुळे दरवर्षी या विषयावर अनेक चित्रपट येत आहेत. परंतु तिन मार चित्रपट दीर्घकाळ चालत आला आहे आणि त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे.
व्युत्पत्ती, स्थाने आणि तारखा
व्युत्पत्ती
सदर या शब्दाचा अर्थ मुख्य मंडळी असा होतो.[५] नारायणगुडा वाईएमसीए येथे साजरा केला जाणारा सदर सर्वांत मोठा आहे.[६][७]
स्थाने
- नारायणगुडा वाईएमसीए सदर-रेड्डी महिला महाविद्यालयाजवळ
- शेकपेट-दरगा सदर
- दीपक टॉकीज सदर-दीपक टॉकीज जवळ, नारायणगुडा
- सैदाबाद सदर
- कैर्थाबाद सदर
- अमिरपेट सदर
- बोवेनपाली
- करवान सदर
- बेगम बाजार
- लँगर हौज सदर
तारखा
दिवाळीनंतर दोन दिवसांनी हैदराबादमध्ये दरवर्षी सदर साजरा केला जातो. हैदराबादमध्ये यादव समाजाच्या ५ दिवसांच्या दिवाळी उत्सवाच्या शेवटच्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो.
दीपावलीच्या दिवशी किंवा दीपावलीच्या एक दिवसांनंतर इतर ठिकाणी हे आयोजन केले जाते जेणेकरून सर्व ठिकाणाहून लोक उपस्थित राहू शकतील. पेधा सदर ३ दिवस (दीपावली नंतर २ दिवस ) नारायणगुडा वाईएमसीए येथे साजरा केला जातो आणि यात यादवां समाजातून सर्वात मोठ्या मंडळींचा सहभाग असतो.
गो पूजा
सदर महोत्सवाची सुरुवात चौधरी यांच्या सादरीकरणासह गो पूजेने होते .
गो पूजा
गोवर्धन पूजेचा हा एक प्रकार आहे. या विधीत, जमिन गायीच्या शेणाने सारवली जाते. त्यावर रांगोळीची सजावट काढली जाते. त्या वरच्या लेयरमध्ये मुरमुऱ्याचा पर्वत केला जातो, त्यात गोड मिठाई आणि सुशोभित भांडी ठेवली जातात. त्या पर्वतावर एक मातीचा दिवा ठेवला जातो. हे गोवर्धन पर्वताचे प्रतिनिधित्व करते.
जत्रची सुरुवात
पूजा पूर्ण झाल्यावर, मिरवणुकीतील पहिला नर म्हसोबा आणला जातो. त्याच्या मार्फत प्रज्वलित दीवा पायदळी तुडवला जातो. सदर उत्सवाची ही अधिकृत सुरुवात मानली जाते.[८]
यासह सदरची मिरवणूक सुरू होते. प्रत्येक कुटुंब त्यांच्या स्वतःच्या डनापोथू (पुरुष म्हसोबा) सह जत्रेत येतात.
संदर्भ
- ^ a b "Traditional 'Sadar festival' celebrated". द हिंदू. Telangana. 7 November 2010. 11 November 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-10-03 रोजी पाहिले.
- ^ "Buffaloes' day out". द हिंदू. Telangana. 11 November 2007. 13 November 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-10-03 रोजी पाहिले.
- ^ Surya, Youtuber Surya (21 November 2021). "Naryanguda Sadar Utsav 2020| Founder of Sadar sammelana | Biggest Sadar festival 2020 in Hyderabad" (इंग्रजी भाषेत). YoutuberSurya. YoutuberSurya Channel.
- ^ "Annual Sadar Festival". सियासत दैनिक.
- ^ "Sadar 2022 Telugu". TV9 Telugu. TV9 Telugu. 25 October 2022 रोजी पाहिले.
- ^ "Sadar 2022 Traffic Restrictions". Telangana Today. Telangana Today. 26 October 2022. 27 October 2022 रोजी पाहिले.
- ^ "Sadar 2022 YMCA Narayanguda". Telangana Today. Telangana Today. 25 October 2022. 25 October 2022 रोजी पाहिले.
- ^ HD, HyBizTv (19 November 2020). "Sadar Festival in Hyderabad 2020 | World's Biggest Bulls Festival | Sadar Utsav 2020" (इंग्रजी भाषेत). HyBizTv. HYBIZTV Channel.