Jump to content

सत्प्रेम

सत्प्रेम

सत्प्रेम (३० ऑक्टोबर १९२३ पॅरिस, फ्रान्स - ९ एप्रिल २००७) हे फ्रेंच लेखक आणि मिरा अल्फासा यांचे शिष्य होते.

प्रारंभिक जीवन

सत्प्रेम यांचे मूळ नाव बर्नार्ड एन्जिंगर असे होते. त्यांचा जन्म पॅरिसमध्ये झाला होता आणि त्यांचे बालपण आणि तारुण्य ब्रिटनीमध्ये व्यतीत झाले होते.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान ते फ्रेंच प्रतिकाराचे सदस्य होते. (" तुर्मा-व्हेंजेन्स " नेटवर्कमध्ये). १९४३ च्या उत्तरार्धात त्यांना गेस्टापोने अटक केली आणि जर्मन छळछावणीमध्ये दीड वर्षे अडकून पडले. या अनुभवाने घाबरल्यामुळे, युद्धानंतर त्यांना आंद्रे गिडे आणि आंद्रे मालरॉक्सच्या 'अस्तित्ववादी विचारसरणी'मध्ये रस निर्माण झाला. [][]

जीवनप्रवास

त्यांनी इजिप्त आणि नंतर भारताचा प्रवास केला, जेथे त्यांनी बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर वसणाऱ्या पाँडिचेरीच्या फ्रेंच वसाहतीच्या प्रशासनात काही काळ नागरी सेवक म्हणून काम केले. तेथे त्यांचा श्रीअरबिंदो आणि द मदर आणि त्यांच्या "नवीन उत्क्रांती"शी परिचय झाला. त्यांनी प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला. आणि पुढे ते फ्रेंच गयानामध्ये साहसाच्या शोधात गेले. तेथे त्यांनी ऍमेझॉनमध्ये एक वर्ष घालवले. ऍमेझॉनमध्ये जाताना त्यांनी त्यांच्यासोबत श्रीअरविंद लिखित 'द लाईफ डिव्हाईन'ची प्रत नेली होती. त्यानंतर ते ब्राझील आणि त्यानंतर आफ्रिका येथे वास्तव्यास गेले.

१९५३ मध्ये, वयाच्या तिसाव्या वर्षी, श्रीमाताजींच्या सेवेसाठी भारतात आणि पाँडिचेरीला परत आले आणि श्रीअरविंद आश्रमात स्थायिक झाले. त्यांनी आश्रमाच्या शाळेत काही काळ अध्यापनाचे काम केले. आश्रमाच्या शारीरिक शिक्षण विभागाच्या त्रैमासिक बुलेटिनमधील फ्रेंच विभागाची जबाबदारी श्रीमाताजींनी त्यांच्यावर सोपविली होती. या दरम्यान त्यांची त्यांच्या जीवनसाथीबरोबर म्हणजे सुजाता नहार यांच्याबरोबर भेट झाली.

त्यानंतर एंजिंगरने काँगो, ब्राझिलिया, अफगाणिस्तान, हिमालय आणि न्यू झीलंड या देशांना भेटी दिल्या, जगभर प्रवास केला. आणि पुन्हा एकदा आश्रमात परत आले.

०३ मार्च १९५७ रोजी, श्रीमाताजींनी त्यांना सत्प्रेम ("जो खरोखर प्रेम करतो") हे नाव दिले. []

सत्प्रेम काही वर्षे अस्वस्थ आणि असमाधानी होते. एकीकडे श्रीअरविंद यांची शिकवण, श्रीमाताजींवरील भक्ती आणि दुसरीकडे भटकंतीची अनावर ओढ यामध्ये मनोमन संघर्ष होत राहिला आणि १९५९ मध्ये त्यांनी पुन्हा आश्रम सोडला. तेरामेश्वरम येथील मंदिराचे पुजारी असलेल्या एका तांत्रिक लामांचे शिष्य बनले. नंतर आणखी एका योग्यांचे शिष्य बनून, त्यांनी सहा महिने भारतभर भटकंती करून, तंत्राचा अभ्यास करणारे संन्यासी म्हणून जीवन व्यतीत केले. सत्प्रेम यांची पार ले कॉर्प्स दे ला टेरे, ओऊ ले सन्यासिन (फ्रेंच), बाय द बॉडी ऑफ द अर्थ ऑर द सन्यासी (इंग्रजी) ही कादंबरी त्यांच्या या जीवनावर आधारित आहे. []

द मदर्स अजेंडा

यानंतर ते पुन्हा श्रीअरविंद आश्रमात परत आले. [] वेळोवेळी श्रीमाताजी त्यांना बुलेटिनच्या कामासाठी बोलावीत असत. या दरम्यान त्यांच्यामध्ये विविध विषयांवर संवाद होत असत. सत्प्रेम श्रीमाताजींना विविध प्रश्न विचारीत आणि त्या त्याची उत्तरे देत असत. सत्प्रेम यांनी हे संवाद टेप-रेकॉर्डरच्या आधारे ध्वनिमुद्रित करायला सुरुवात केली. या संवादांमधूनच १३ खंडांचा 'द मदर्स अजेंडा' हा ग्रंथ-प्रकल्प तयार झाला. त्यातील पहिला भाग १९५१ ते १९६० या कालावधीमधील आहे (आणि त्यात सत्प्रेम यांनी भटकंतीच्या दिवसांत श्रीमाताजींना लिहिलेली पत्रे समाविष्ट आहेत) आणि १९७३ साली हा प्रकल्प पूर्ण झाला.

अजेंडाच्या बहुतांश भागामध्ये श्रीमाताजींच्या आंतरिक आणि बाह्य अनुभवांचे स्पष्टीकरण आहे. सत्प्रेम यांच्या टिप्पण्या आणि प्रश्नदेखील त्यात समविष्ट आहेत. श्रीमाताजींनी यामध्ये शारीरिक परिवर्तन करण्याच्या त्यांच्या सततच्या प्रयत्नांबद्दल चर्चा केली होती; ज्यामुळे आजारपण आणि मृत्यूवर मात करता येईल असा त्यांनी जो प्रयोग केला होता त्याचे स्पष्टीकरण अजेंडामध्ये आहे. या प्रयोगाद्वारे त्यांनी एका आध्यात्मिक शक्तिप्रति स्वतःच्या भौतिक शरीराला खुले करण्याचा प्रयत्न केला होता, हा प्रयोग केवळ स्वतःसाठीच नाही तर संपूर्ण मानवतेसाठी त्या करत होत्या, त्या प्रयोगाबद्दल दोघांमध्ये झालेल्या चर्चादेखील अजेंडामध्ये समाविष्ट आहेत.[]

अजेंडामध्ये शिष्य आणि अतिथी यांच्याशी श्रीमाताजींनी साधलेला संवाद आहे. जगामध्ये घडणाऱ्या घटना, भारत-चीन युद्ध, इंदिरा गांधींसोबतचे त्यांचे संबंध, त्यावेळच्या तरुणांमधील क्रांती, ऑरोविलच्या विकासासाठी चालू असलेल्या योजना, श्रीमाताजींचे लहानपणीचे अनुभव आणि नंतर चित्रकार म्हणून आणि नंतर मॅक्स थेऑनची शिष्य म्हणून त्यांचे भूतकाळातील अनुभव; श्रीअरविंद यांच्या निधनापूर्वीचे आणि नंतरचे त्यांच्या बाबतीतले अनेक अनुभव, अनेक हिंदू देवतांचे आलेले अनुभव; अशा असंख्य विषयांवर श्रीमाताजी आणि सत्प्रेम यांच्यामध्ये चर्चा होत असत. या साऱ्या गोष्टींचा समावेश अजेंडामध्ये आहे.

श्रीमाताजी आणि सत्प्रेम यांच्यामधील नात्याचे दर्शन अजेंडामध्ये दिसून येते. श्रीमाताजींनी वेळोवेळी त्यांच्या बुद्धीची आणि श्रीअरविंद यांच्या शिकवणीबद्दलची सत्प्रेम यांना जी समज होती त्याची प्रशंसा केली आहे आणि त्यांना त्यांच्या साधनेसाठी, म्हणजे आध्यात्मिक विकासासाठी प्रोत्साहित केले आहे. श्रीमाताजींनी सत्प्रेम यांच्या उणिवा, मर्यादा यांच्याकडेही लक्ष दिले आहे. त्याचप्रमाणे, एक लेखक म्हणून श्रीमाताजींनी त्यांना नेहमीच प्रोत्साहन दिले आहे; अनेकदा त्यांनी त्यांच्या लेखनावर एकत्र काम केले आहे. या सर्व प्रकल्पांमध्ये सत्प्रेम यांना सुजाता नहार यांचे सहकार्य लाभले होते.

'द मदर्स अजेंडा'चे १३ खंड प्रकाशित करण्यासाठी त्यांनी जुलै १९७७ मध्ये पॅरिसमध्ये इन्स्टिट्यूट डी रिचेचेस इव्होल्युटिव्हज (इन्स्टिट्यूट फॉर इव्होल्युशनरी रिसर्च ) ही ना-नफा ना-तोटा या तत्त्वावर चालणारी संस्था स्थापना केली. []

श्रीमाताजींच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी श्रीअरबिंदो, ओऊ ल आडव्हेन्चर दे ला कॉन्शस (फ्रेंच - प्रकाशन १९६४) , श्री अरविंद अथवा चैतन्याचे अपूर्व साहस[] (मराठी - प्रकाशन २००१) लिहिले. १९७२ आणि १९७३ मध्ये त्यांनी, श्रीमाताजींच्या मार्गदर्शनाखाली, ला जेनेसे डू सुरहोम (फ्रेंच) (ऑन द वे टू सुपरमॅनहुड ) हा निबंध लिहिला. तो १९७४ मध्ये प्रकाशित करण्यात आला.

१९८२ मध्ये द अजेंडाचे सर्व १३ खंड फ्रेंच भाषेत प्रकाशित झाले आणि सत्प्रेम यांना वाटले की आपले सर्व बाह्य कार्य पूर्ण केले आहे. [] पुढच्या वर्षी, त्यांनी आणि सुजाता यांनी स्वतःला श्रीअरविंद आणि श्रीमाताजी प्रणीत शरीरातील पेशीय चेतनेचे परिवर्तन आणि नवीन उत्क्रांती आणि महान मार्गाचा शोध' या कार्यासाठी समर्पित केले.[१०] पुढे म्हणजे १९७८ मध्ये सत्प्रेम आणि सुजाता यांनी पुडूचेरी सोडले.

मृत्यू

सतप्रेम यांचे ०९ एप्रिल २००७ रोजी वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांच्या जीवनसाथी सुजाता नहार यांचा मृत्यू ०४ मे २००७ रोजी झाला.

सत्प्रेम लिखित ग्रंथ

  • वेद अँड ह्युमन डेस्टिनी (१९६१)
  • द गोल्डफाइंडर (१९६४)
  • श्रीअरबिंदो ऑर द ऍडव्हेंचर ऑफ कॉन्शियन्स, मीरा अदिती, म्हैसूर, आणि द मदर्स इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च, नवी दिल्ली (१९६४) (२००० - दुसरी आवृत्ती)
  • द ग्रेट सेन्स (१९६९)
  • श्रीअरबिंदो आणि पृथ्वीचे भविष्य (१९७१)
  • नोटबुक ऑफ एन एपोकॅलिप्स - (१९७३ / २००७), खंड २४
  • लु मेंटल देस सेल्युस (फ्रेंच), (द माइंड ऑफ द सेल्स - इंग्रजी) (१९८०)
  • माय बर्निंग हार्ट, इनग्राम, टेनेसी (१९८१),
  • मदर्स अजेंडा इन्स्टिट्युट डी रिचेचेस इव्होल्युटिव्हज, पॅरिस आणि मीरा अदिती, म्हैसूर (१३ खंडांचा संच) (१९८२)
  • ला रिवोल्ट द ला टेरे (फ्रेंच), (द रिवोल्ट ऑफ द अर्थ - इंग्रजी) १९८९ यामध्ये त्यांनी शरीरांतर्गत केलेल्या संशोधनाचे वर्णन आले आहे.
  • द माइंड ऑफ द सेल - इन्स्टिट्यूट डी रिचेचेस इव्होल्युटिव्हज, पॅरिस आणि मीरा अदिती, म्हैसूर (१९८२, १९९९)
  • इव्होल्यूशन सेकंड - इन्स्टिट्यूट डी रिचेचेस इव्होल्युटिव्ह्ज, पॅरिस, आणि मीरा अदिती, म्हैसूर - १९९२ मध्ये प्रकशित करण्यात आलेल्या या पुस्तकात ''मनुष्यानंतर, कोण? आणि मनुष्यानंतर, कसे?'' याचा वेध घेण्यात आला आहे.
  • मध्ये त्यांचे लेटर्स द उन इन्सौमीस (फ्रेंच), (लेटर्स ऑफ अ रिबेल - इंग्रजी), १९९४ - आत्मचरित्रात्मक पत्रव्यवहाराचे दोन खंड
  • ला ट्रॅजिडी दे ला टेरे - डी सोफोक्ल अ श्रीअरबिंदो (फ्रेंच), द ट्रॅजिडी ऑफ द अर्थ - फ्रॉम सोफोक्लीस टू श्रीऑरोबिंदो (इंग्रजी), (१९९५)
  • द रिव्हॉल्ट ऑफ द अर्थ - इन्स्टिट्यूट डी रिचेचेस इव्होल्युटिव्हज, पॅरिस, आणि मीरा अदिती, म्हैसूर (१९९८)
  • ला क्लेफ देस कॉन्टेस (फ्रेंच), द की ऑफ टेल्स (इंग्रजी) - (१९९८)
  • द ट्रॅजेडी ऑफ द अर्थ - इन्स्टिट्यूट डी रिचेचेस इव्होल्युटिव्हज, पॅरिस, आणि मीरा अदिती, म्हैसूर (१९९८)
  • निएंडरथल लुक्स ऑन - (१९९९)
  • द लिजेंड ऑफ टुमॉरो - (२०००)
  • ला लेजंड दे ल'अवेनिर (फ्रेंच) - (२०००)
  • द फिलॉसॉफी ऑफ लव्ह - (२००२)
  • मेमोईर्स द'उन पॅटॅगोनियन - कौंटे प्रीहिस्टॉरिक एट पोस्टहिस्टॉरिक (फ्रेंच) आणि ला फिलोसॉफी दे ल'अमूर (फ्रेंच) - (२००२)
  • ऑन द वे टू सुपरमॅनहुड - मीरा अदिती, म्हैसूर, आणि द मदर्स इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च, नवी दिल्ली (२००२)
  • ले मटेरिऍलिसम डिव्हिन (फ्रेंच), (द डिव्हाईन मटेरिअलिसम - इंग्रजी)
  • लुएस्पेक नुवेल (फ्रेंच), (द न्यू स्पेशीज - इंग्रजी)
  • ला म्युटेशन दे ला मोर्त (फ्रेंच), (द म्युटेशन ऑफ डेथ - इंग्रजी)
  • ला विए सान्स मोर्त (फ्रेंच), (लाईफ विदाऊट डेथ - इंग्रजी) ल्यूक वेनेट हे सहलेखक आहेत. या पुस्तकात सत्प्रेम यांच्या आश्रमोत्तर जीवनाची झलक पाहता येते.[११]
  • त्यांचे शेवटचे पुस्तक, ल'ओअसिऊ दोएल (फ्रेंच), २००८

मराठी अनुवाद

  • श्रीअरविंद अथवा चैतन्याचे अपूर्व साहस (मराठी), मीरा अदिती, म्हैसूर, आणि द मदर्स इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च, नवी दिल्ली, अनुवाद - श्री.भा.वि.कुलकर्णी, २००१, ISBN 81-85137-67-6
  • वेद आणि मानवी नियती, १९९८
  • महान प्रयोजन अथवा श्रीअरविंद आणि पृथ्वीचे भविष्य, २०००
  • भारताचा पुनर्जन्म, २००१ [१२]

संदर्भ

  1. ^ Georges van Vrekham, Beyond the Human Species p.370
  2. ^ "Satprem | Auroville". auroville.org. 2023-04-05 रोजी पाहिले.
  3. ^ Agenda vol.1, p.48 n.2, and p.100
  4. ^ Beyond the Human Species p.371
  5. ^ Mother's Agenda vol.1 p.327
  6. ^ Georges Van Vrekhem (1997). Beyond Man - The Life and Work of Sri Aurobindo and The Mother. Stichting Aurofonds (Dutch). ISBN 81-291-1142-X.
  7. ^ Robert Minor, The Religious, the Spiritual, and the Secular p.177 note 4
  8. ^ लेखक - सत्प्रेम, अनुवाद - भा.वि.कुलकर्णी (२००१). श्री अरविंद अथवा चैतन्याचे अपूर्व साहस. म्हैसूर: मिरा अदिती. ISBN 81-85137-67-6.
  9. ^ Luc Venet Life without Death, p.113
  10. ^ "Satprem | Auroville". auroville.org. 2023-04-05 रोजी पाहिले.
  11. ^ Life without Death, Part 3: Satprem (pp.107ff.)
  12. ^ श्रीअरविंद अथवा चैतन्याचे अपूर्व साहस (मराठी), मीरा अदिती, म्हैसूर, आणि द मदर्स इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च, नवी दिल्ली, अनुवाद - श्री.भा.वि.कुलकर्णी, २००१, ISBN 81-85137-67-6

संदर्भ-सूची

  • मदर्स अजेंडा (१९७९-xxxx) (इंग्रजी अनुवाद) इन्स्टिट्यूट फॉर इव्होल्यूशनरी रिसर्च, न्यू यॉर्क, एनवाय (१३ खंडांचा संच)
  • डेव्हिड जे. लोरेन्झो, ट्रॅडिशन अँड ह्रेटॉरिक ऑफ राईट: अरबिंदो चळवळीतील लोकप्रिय राजकीय युक्तिवाद, फेअरले डिकिन्सन युनिव्हर्सिटी प्रेस, १९९९ आयएसबीएन 0-8386-3815-5
  • रॉबर्ट एन. मायनर, द रिलिजिअस, द स्पिरिच्युअल अँड द सेक्युलर: ऑरोविल आणि सेक्युलर इंडिया, सनी प्रेस, १९९८, आयएसबीएन 0-7914-3991-7
  • द माइंड ऑफ द सेल - इन्स्टिट्यूट फॉर इव्होल्यूशनरी रिसर्च, न्यू यॉर्क, एनवाय, १९८२ आयएसबीएन 0-938710-06-0
  • जॉर्जेस व्हॅन व्रेखेम, बियाँड द ह्युमन स्पेशिज पॅरागॉन हाऊस, सेंट पॉल, मिनेसोटा, १९९८, आयएसबीएन 978-1-55778-766-8 (१९९५ डचमध्ये प्रथम प्रकाशित)
  • लुक व्हेनेट (१९८५) लाईफ विदाऊट डेथ, इन्स्टिट्यूट फॉर इव्होल्यूशनरी रिसर्च, न्यू यॉर्क, एनवाय, आयएसबीएन 0-938710-23-0
  • एल्फी, निकोल (१९९८). सत्प्रेम - पार उन फील दे ल्युमिएर, चरित्र. पॅरिस: आर. लाफॉन्ट.
  • आकाश कपूर (२०२१), बेटर टू हॅव गोन. ऑरोविल

बाह्य दुवे