Jump to content

सत्त्वगुण

सत्त्वगुण किंवा अनेकदा (सात्त्विक,सात्त्विक,सत्त्व,सत्य,सत्त्व) ह्या नावांनी उल्लेख होणारा गुणधर्म किंवा सृष्टीचा गुण आहे.सांख्य शास्त्रात उल्लेखीत केल्याप्रमाने ,सत्त्व(सात्त्विक) म्हणजे शुद्ध किंवा "प्रकाशमान" तर रज(राजसिक) म्हणजे "मंद" आणि तम (तामसीक) म्हणजे "गडद"/काळोख/अंधारासम तत्त्व.ह्या गुणात कोणतीही क्रमवारी किंवा उच्च नीच असे न मानता ह्या गुणांका एकमेकांचे "पुरक" असे मानण्यात आले आहे,व प्रत्येक गुण हा "अविभाज्य" मानण्यात आले आहे.सत्त्व गुण हा प्रकृती मुळे निर्माण झालेल्या तीन गुणांपैकी एक गुण आहे. प्रत्येक व्यक्तीवर कुठल्याही क्षणी हे तीन गुण विविध प्रमाणात प्राबल्य करीत असतात. मोक्ष किंवा मुक्ती मिळविण्यासाठी या तीन गुणांच्या पलिकडे जाणे आवश्यक असते.
ज्ञान, परोपकार, दान, समाधान, देवभक्ती, विवेक, उत्साह, वासनांवर विजय, मनावर ताबा ही सत्त्वगुणाची लक्षणे आहेत.

सात्त्विक वस्तु

एखादी वस्तु किंवा व्यक्ती सात्त्विक असण्यासाठी तीच्याद्वारे कोणताही रोग,वाईट/उपद्रवी प्रवृत्ती किंवा दुषितपणा फैलणार नाही हे आवश्यक असते,तसेच ती कोणत्याही इतर मुलद्रव्यांपासून दुषित असता कामा नये,शुद्धता हा मुख्य गुणधर्म असणाऱ्या वस्तुंना सात्त्विक संबोधले जाते.ह्या उलट ज्या वस्तुंमुळे किंवा व्यक्तींमुळे त्यांच्या आस्तित्वाने आजुबाजूचे वातावरण शुद्ध होते अशा वस्तु किंवा व्यक्ती सात्त्विक होय.जेव्हा एखादी व्यक्ती सात्त्विक अन्न ग्रहण करते (खाते)त्यावेळी तिला शुद्धतेचा अनुभव मिळून मनाचे समाधान मिळते.

सात्त्विक मनुष्याची लक्षणं

  • सात्त्विक मनुष्याची लक्षण खालील प्रमाणे.

त्याचे मन स्थिर,एकाग्र आणि शांत ,प्रसन्नचित्त असते.त्याच्या बोलण्यात कधीही अश्लिल किंवा उद्धटपणा नसतो.त्यास कसलाच लोभ,मोह,नसतो व ईर्ष्या नसते.त्यास काम आणि क्रोध विचलीत करू शकत नाही.तो कुणासही फसवत नाही किंवा चुकीचे उपदेश देत नाही,त्याउलट त्याच्या वाणीत सदैव सत्यवचन असून त्याचे बोलणे नियंत्रीत असते.कर्म करित असतांना फळाची अपेक्षा न ठेवता निर्व्याज वृत्तीने कर्म करणे हे त्याचे ध्येय असते.तो धर्माने नेमुन दिलेल्या तत्त्वांनुसार जीवन व्यतीत करतो.शांत आणि मृदू स्वभाव ही त्याची ठळक लक्षणं असतात.

हे सुद्धा पहा