Jump to content

सती (प्रथा)

एक १८ व्या शतकातील चित्र् सती दर्शवितांना

सती (प्रथा) (इंग्रजी: Sati (practice) or suttee) ही एक अप्रचलित अग्नी दहन प्रथा आहे. काही प्राचीन भारतीय हिंदू समाजात ही एक धार्मिक प्रथा प्रचलित होती[].

भारतातील प्राचीन हिंदू समाजाची घृणास्पद आणि चुकीची प्रथा होती. या प्रथेमध्ये विधवा पत्नीला मृत्यू झालेल्या पतिचा अंत्यसंस्काराच्या वेळी चितेवर जिवंत जाळले जात असे. किंवा विधवा महिला तिच्या पतीच्या अंत्यसंस्काराच्या वेळी स्वतः त्या जळत्या चितेवर उडी मारून आत्मदाह करत असे.[]

इतिहास

ह्या प्रथेचा ऊल्लेख ३ रा शतक ख्रिस्त पूर्वी मध्ये झाला आहे. पण पुरावा ५ व्या व नव्वया शतकांपासुनच आहे. हिंदू व सीख अमीर उमरावी घराण्यांमध्ये ही व्यवस्था जास्त होती. दक्षिण आशियातील काही ठिकाणी सुद्धा ही प्रथा चालायची.राणी पद्मिनी ऊर्फ पद्मावती ही चित्तोडगढ राज्याची राणी व राजा रतनसिंह याची पत्‍नी होती, राणी पद्मिनी आणि इतर सोळाशे महिलांसह 'जौहर' करून भस्मसात झाली[][] शिवाजीच्या ज्येष्ठ पत्नी पुतलाबाईंनी आपल्या पतीच्या निधनानंतर सती गेल्या.[]

सतिबंदी करणारा महानुभाव पंथ

कामाइसा सती प्रकरण यादव सम्राट रामचंद्रदेवाची राणी कामाइसा होती. रामचंद्रदेवाच्या मृत्युनंतर तिने सती जावे अशी तिच्यावर सक्ती करण्यात आली. पण तिला नागदेवाचार्यांकडून महानुभाव पंथाचा उपदेश होता. 'पिंडहनन केलेया ब्रह्मांडहनन होए' (श्री चक्रधरोक्त सुत्रपाठ विचार सूत्र ६८) वचनानुसार तिने सती जाण्याचे नाकारले. रामचंद्रदेवाचा पुत्र सिंघणदेव तृतीय याला ती म्हणाली 'मज सत्त्व नाही: मी तुझिये भानवसीचा ठोंबरा खाऊन असैनः'(स्मृतीस्थळ क्र.१४९,१५०) तिला सती जावेच लागले. पण नागदेवाचार्यांचा अभिप्राय तिला आत्महत्येचे नरक होणार नाहीत असाच पडला. धर्मवार्तेसाठी विष, वाघवळ, सूरी, पाटी आदि साधनांनी आत्महत्या केल्यास आत्महननरूप मळ लागतो पण ते कर्म वाया जात नाही मात्र असे जर अविद्येकारणे केले तर मात्र नरक होतात असाही त्यांचा अभिप्राय आहे.

ब्रिटिश कालीन भारतात ही प्रथा पहिल्यांदा चालायची. बंगाल भागात ह्या प्रथे दर्म्यान एक सरकारी अधिकारी उपस्थीत राहायचा. १८१५ ते १८१८ च्या मध्ये, बंगालात सतींची संख्या ३७८ वरून ८३९ वर गेली. सती विरुद्ध ख्रिश्चन मिशनरी, जसे विल्यम केरी, व समाजसेवक, जसे राजाराम मोहन रॉय, ह्यांनी सतत आंदोलने केल्या नंतर, सरकारने १८२९ साली सती प्रथेवर बंदी आणली. त्यानंतर ईतर राज्यांमध्ये सुद्धा त्यासारखेच कायदे राबविण्यात आले. १८६१ मध्ये पूर्ण भारतावर क्वीन विक्टोरिया द्वारे सतीवर बंदी आणण्यात आली होती. नेपाळात १९२० साली सती वर बंदी आली. १९८८ च्या भारतीय सती प्रतिबंधक कायद्याने सतीबद्दलच्या सहायावर, ऊत्तेजनावर व सतीचा गौरव करण्याला गुन्हेगारी स्वरूप दिले.

व्युत्पत्तिशास्त्र

सतीची पौराणिक कथा

सती [] हा शब्द सती देवीपासून (दक्षायानी देखील म्हणले जाते) उत्पत्ती केली आहे. पिता राजा दक्ष प्रजापती यांनी सती देवी पती असलेल्या शिव यांचा अपमान केल्याने, सहन करू न शकल्यामुळे या कारणामुळे दक्ष प्रजापती यांची पुत्री सतीने यज्ञाकुंडाच्या अग्नीमध्ये उडी घेऊन देवी सतीने तिचे जीवन संपवले.[][]

संदर्भ यादी

  1. ^ a b "सती प्रथा". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2020-01-16.
  2. ^ a b "सती प्रथा - भारतकोश, ज्ञान का हिंदी महासागर". bharatdiscovery.org. 2020-01-19 रोजी पाहिले.
  3. ^ "पद्मिनी". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2019-12-22.
  4. ^ Jaswant Lal Mehta (2005-01-01). Advanced study in the history of modern India 1707-1813. p. 47. ISBN 9781932705546.
  5. ^ "सती (हिंदू देवी)". विकिपीडिया. 2018-03-18.
  6. ^ "Sati (practice)". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2020-01-14.

बाह्य दुवा