Jump to content

सतीश गुजराल

सतीश गुजराल

सतीश गुजराल (२५ डिसेंबर, इ.स. १९२५ - ) हे एक भारतीय चित्रकार आहेत. भारताचे माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचे धाकटे बंधू असलेल्या सतीश गुजराल यांचा जन्म ब्रिटिश भारतातील झेलम या पश्चिम पंजाबमधील गावी झाला. जगभरातील अनेक ठिकाणी त्यांच्या चित्रांची प्रदर्शने झालेली आहेत. न्यू यॉर्कमधील 'म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट', हिरोशिमामधील 'हिरोशिमा कलेक्शन', नवी दिल्लीमधील 'नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट' यांसारख्या वेगवेगळ्या संग्रहालयात त्यांची चित्रे लावण्यात आलेली आहेत.