Jump to content

सटाणा

सटाणा शहर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील तालुक्याचे गाव आहे. 2011च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या 37701 होती.

हे शहर देव मामलेदार यशवंतराव महाराज यांचे कार्यक्षेत्र आहे. मामलेदार महाराजांनी तत्कालीन दुष्काळात तथाकथित दैवी आदेशाने मोलाचे कार्य केले, त्यामुळे सटाणामधील जनतेने त्यांना देवत्व बहाल केले . नाशिक जिल्ह्यातील उंचीवरील सर्वाधिक ठिकाणे सटाणा तालुक्यात आढळतात.उदा.मांगी-तुंगी डोंगर, साल्हेर-मुल्हेर किल्ले.

भूगोल

सटाणा २0°35′३७″N ७४°१२′00″E येथे स्थित आहे.[२] त्याची सरासरी उंची ५४४ मीटर (१७८४ फूट) आहे.

या तहसीलमध्ये तिळवण, पिसोळ, साल्हेर या ऐतिहासिक किल्ल्यांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात आवटीचे जंगल प्रसिद्ध आहे

[[वर्ग:बागलाण तालुका]]