Jump to content

सचिन कुंडलकर

सचिन कुंडलकर
कार्यक्षेत्र चित्रपट (दिग्दर्शन, कथा),
नाटक (लेखन),
साहित्य
कारकीर्दीचा काळ इ.स. २००६ - चालू
भाषामराठी
प्रमुख नाटके छोट्याश्या सुट्टीत,
फ्रीजमध्ये ठेवलेलं प्रेम
प्रमुख चित्रपटरेस्टॉरंट, गंध

सचिन कुंडलकर (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हा मराठी भाषेतील चित्रपटदिग्दर्शक, लेखक, नाटककार आहे. मराठी भाषेतील चित्रपटांशिवाय याने हिंदी भाषेतही चित्रपट-दिग्दर्शन केले आहे.

जीवन

कारकिर्दीची सुरुवात

सचिन कुंडलकर याचा जन्म महाराष्ट्रातल्या पुणे शहरातल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्याचे वडील एका खासगी कंपनीत नोकरी करत, तर आई पाळणाघर चालवत असे []. शालेय दिवसातिल चित्रपटाच्या आवडीने ते प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर ह्यांच्याकडे कामास गेले असताना, गोवारीकरांनी त्यांना शिक्षण पूर्ण करून येण्याचे सुचवले. पुण्याच्या भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेत (एफ.टी.आय.आय. संस्थेत) त्याने चित्रपटविषयक अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेतले []. महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षात शिकत असताना त्याने दोघी चित्रपटाच्या दिग्दर्शनाच्या कामी सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर यांच्यासाठी साहाय्यकाचे काम केले []. नंतर त्यांनी ज़िन्दगी जिंदाबाद , भैस बराबर आणि दहावी फ चित्रपटात सहायकाचे काम केले. फ्रेंच सरकार कडून मिळालेल्या शिष्यवृत्तितुन,ला फेमिस, पॅरिस, येथे दाखल घेतला.

लघु चित्रपट

व्यावसाईक चित्रपट दिग्दर्शनाकडे वळन्या आधी ह्यांनी लघु चित्रपट व नाटक क्षेत्रात काम केले. एफ.टी.आय.आय. मधे शिकत असताना त्यांनी आउट ऑफ़ द बॉक्स हा लघु चित्रपट बनवला. त्यांचा इ.स. २००५ मधील लघु चित्रपट द बाथ समलैंगिकते वर आधारित होता व त्यात रजत कपूर ह्यानी प्रमुख भूमिका साकारली होती. हा चित्रपट ३०वे सॅन फ्रान्सिस्को अंतर्राष्ट्रीय एल जी बी टी चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला होता.

नाटक व इतर लिखाण

कुंडलकारांची नाटकं, छोट्याश्या सुट्टीतपूर्णविराम हे खूप गाजले व त्यांचे हिंदी आणि इंग्रजीत पण प्रयोग झाले. ऑन वेकेशन ह्या नावाने छोट्याश्या सुट्टीतचे इंग्रजीत प्रयोग झालेत.

कुंडलकर याची पहिली प्रकाशित कादंबरी कोबाल्ट ब्लू त्याने वयाच्या विसाव्या वर्षी लिहिण्यास घेतली व दोन वर्षांत ती कादंबरी लिहून पुरी केली [].

व्यावसायिक चित्रपट

इ. स. २००६ मध्ये कुंडलकारांचा पहिला चित्रपट रेस्टॉरंट प्रदर्शित झाला. ह्या चित्रपटात सोनाली कुलकर्णी प्रमुख भूमिकेत दिसल्या. ह्या चित्रपटाचा सामावेश ४थे गोवा मराठी चित्रपट मोहोत्सव, १२वे आंतरराष्ट्रीय केरळ चित्रपट मोहोत्सव, ८वे मुंबई चित्रपट मोहोत्सव मध्ये झाला. चित्रपटास समीक्षकांनी चांगले गुण दिले. २००७ मध्ये त्यांचा पुढील चित्रपट निरोप प्रदर्शित झाला. फ्रांस मध्ये स्थाईक होण्याआधी कोकणातील आपल्या गावी आलेल्या एका संगीतकाराच्या मनातील गुंतागुंतीची ही कहाणी होती. समीर धर्माधिकारी व देविका दफ्तरदार ह्यांनी संगीतकार आणि त्याच्या पत्नीची भूमिका साकारली. ह्या चित्रपटासाठी कुंडलकारांना त्यांचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ५५वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ह्या चित्रपटाचा "सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट" म्हणून सन्मान झाला. हा पुरस्कार त्यांनी चित्रपटाच्या निर्मात्या अपर्णा धर्माधिकारी ह्याच्या सोबत स्वीकारला.

२००९ सालात प्रेक्षकांच्या समोर एका वेगळ्या प्रकाराच्या चित्रपटासोबत ते हजर झाले. गंध हा तीन एकमेकास भिन्न कथा जोडणारा चित्रपट होता. त्यातील समान दुवा होता तो फक्त मानवीय जाणीव, गंध. चित्रपटात नीना कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी , मिलिंद सोमण, अमृता सुभाष व इतर कलाकारांच्या प्रमुख भूमिका होत्या. ह्या चित्रपटासाठी त्यांना "सर्वोत्कृष्ट चलचित्र कथानक" ह्या विभागात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.

पुढे कुंडलकरांनी आपला मोर्चा बॉलीवूड कडे वळवला. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी व मलयाळम आणि तमिळ चित्रपटातील अभिनेता पृथ्वीराज सुकुमार ह्यांच्या मुख्य भूमिका असलेला अय्या २०१२ मध्ये प्रदर्शित झाला.

कारकीर्द

चित्रपट

चित्रपटाचे नाववर्ष (इ.स.)भाषासहभाग
रेस्टॉरंट२००६मराठीदिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद
निरोप२००७मराठीदिग्दर्शन, कथा, पटकथा
गंध२००९मराठीदिग्दर्शन
अय्या२०१२हिंदीदिग्दर्शन
हॅपी जर्नी२०१४मराठीदिग्दर्शन

नाटक

नाटकाचे नाववर्ष (इ.स.)भाषासहभाग
ड्रीम्स ऑफ़ तालीमइंग्रजीलेखन
छोट्याश्या सुट्टीतमराठीलेखन
फ्रीजमध्ये ठेवलेलं प्रेममराठीलेखन
पूर्णविराममराठीलेखन

संदर्भ व नोंदी

  1. ^ a b ""बेस्ट यंग रायटर्स"" (इंग्लिश भाषेत). ३१ जुलै, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ a b कुलकर्णी, प्रणव. ""डायरेक्टर्स चॉइस"" (इंग्लिश भाषेत). ३१ जुलै, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे