Jump to content

सखाराम गंगाधर मालशे

सखाराम गंगाधर मालशे
जन्म २४ सप्टेंबर १९२१
मृत्यू ७ जून १९९२

डॉ. स.गं. मालशे (जन्म : २४ सप्टेंबर १९२१; - ७ जून १९९२) हे मराठी लेखक, समीक्षक व संपादक होते.

एम.ए. झाल्यावर मालशे मराठीचे प्राध्यापक झाले. 'फादर स्टीफन्सकृत ख्रिस्त पुराण’ भाषिक अभ्यास या विषयावर त्यांनी पीएच,डी केली. मराठी संशोधन पत्रिका, महाराष्ट्र साहित्य पत्रिका आदी नियतकालिकांचे ते संपादक होते.

आपल्या लेखन कारकिर्दीच्या सुरुवातीला स.गं. मालशे यांनी 'व्यंकटेश माडगूळकर यांच्या कथा ', हसा आणि लठ्ठ व्हा’ ही संपादने केली. त्यांच्या ललित लेखांचा संग्रहही ' ‘आवडनिवड’ या नावाने प्रसिद्ध झाला. 'नीरक्षीर' हा त्यांच्या नाट्यविषयक लेखांचा संग्रह. या संग्रहातून पाश्चात्त्य नाट्यकृतींसंबंधी व दिग्दर्शकांसंबंधीचे लेख आहेत. कालांतराने मालशे ऐतिहासिक दृष्टीने विचार करणारे संहिताभ्यासक, संपादक व समीक्षक म्हणून ओळखले जाऊ लागले. 'केशवसुतांच्या कवितांचे हस्तलिखित', 'सावरकरांच्या अप्रसिद्ध कविता', 'लोकहितवादीकृत जातिभेद', 'दोन पुनर्विवाह प्रकरणे', स्त्री - पुरुष तुलना अशा अनेक संहितात्मक पुस्तिका त्यांनी प्रसिद्ध केल्या.

मालशे यांनी धनंजय कीर यांच्या सहकार्याने जोतिबा फुलेकृत 'शेतकऱ्यांचा आसूड', 'महात्मा फुले समग्र वाङमय', 'झेंडूची फुले' हे सर्व ग्रंथ संपादन करून पुनःप्रकाशात आणले.

मालश्यांचे आणखी एक मोलाचे कार्य म्हणजे ऑस्टिन वाॅरेन आणी रेने' वॆलेक यांनी लिहिलेल्या 'थिअरी ऑफ लिटरेचर' या पुस्तकाचा 'साहित्य सिद्धान्त' असा अनुवाद केला. या ग्रंथातून साहित्यसमीक्षा, साहित्य संशोधन, साहित्योतिहास, साहित्यभासाच्या पद्धती यासंबंधी चर्चा केली आहे.

याशिवाय मालशे यांनी युजीन ओ'नीलच्या 'स्ट्रेंज इंटरल्यूड' या नाटकाचा अनुवाद 'सुख पाहता' असा केला. मालशे यांच्या एकूण लिखाणातून

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष इत्यादी
अध्यापक अत्रेसंपादनसहलेखक : आचार्य अत्रे
आगळं वेगळंललित
आवडनिवडललित
ऋणानुबंधाच्या गाठीव्यक्तिचित्रे
केशवसुतांच्या कवितांचे हस्तलिखितसंपादित
गडकरीसंपादन
चतुराईच्या गोष्टीबालसाहित्य
जादूवे स्वप्नबालसाहित्य
तारतम्यपरचुरे प्रकाशन
दोन पुनर्विवाह प्रकरणेपुस्तिका
नाटकाची स्थित्यंतरेकृ.आ. गुरुजी यांनी लिहिलेल्या लेखांचे संपादन
नीरक्षीरनाट्यविषक लेखन
प्र.के. अत्रे यांचे गडकरींविषयक लेखसंपादन
भाषाविज्ञान परिचयभाषाशास्त्रपद्मगंधा प्रकाशनसहलेखक : डॉ. द.दि. पुंडे व डॉ.अंजली सोमण
भाषाविज्ञान : वर्णनात्मक आणि ऐतिहासिकभाषाशास्त्रपद्मगंधा प्रकाशनसहलेखक : डॉ. हे.वि. इनामदार व डॉ. अंजली सोमण
मराठी वाङ्‌मयाचा इतिहासदोन खंड, प्रत्येकी दोन भाग
लाडवाकादंबरी
लोकहितवादीकृत जातिभेदपुस्तिका
विधवा विवाहाची चळवळ १८००-१९००वैचारिकसहलेखिका : नंदा आपटे
विलक्षण तंटेबालसाहित्य
व्यंकटेश माडगुळकर यांच्या कथासंपादित
शोधनिबंधांची लेखनपद्धतीमाहितीपर
सयाजीराव गायकवाडचरित्रसहलेखक : व्ही.के. चावडा
सावरकरांच्या अप्रसिद्ध कवितासंपादित
साहित्य सिद्धान्तवैचारिकअनुवादित, मूळ इंग्रजी Theory of Literature
सुख पाहतानाटकअनुवादित, मूळ इंग्रजी युजीन ओ'नीलचे 'स्ट्रेंज इंटरल्यूड'
स्त्री-पुरुष तुलनासमीक्षा
हंसा आणि लठ्ठ व्हासंपादित, मूळ लेखक - हरिश्चंद्र लचके