Jump to content

सकवारबाई भोसले द्वितीय


महाराणी सकवारबाई शाहूराजे भोसले
महाराणी
मराठा साम्राज्य
अधिकारकाळ१७०८ - १७४९
अधिकारारोहणसम्राज्ञी पदाभिषेक
राज्याभिषेक१२ जानेवारी १७०८
राजधानीसातारा
पूर्ण नावसकवारबाई शाहूराजे भोसले
पदव्यासम्राज्ञी, महाराणी
मृत्यू१७४९
सातारा, महाराष्ट्र
पूर्वाधिकारीमहाराणी ताराबाई
वडीलराणोजी शिर्के
पतीछत्रपती सम्राट शाहू महाराज
संततीगजराबाई
राजघराणेभोसले
चलनहोन

महाराणी सकवारबाई भोसले ह्या छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांच्या पट्टराणी होत्या. महाराणी सकवारबाई साहेब या शिर्के घराण्यातील होत्या. त्यांच्या वडिलांचे नांव राणोजी राजेशिर्के असे होते. सकवारबाईना गजराबाई या नावाची एक कन्या होती. ती कदमबांडे यांना दिलेली होती.भोसले घराण्याचे विवाह संबंध जास्तीत जास्त शिर्के व मोहिते घराण्याशीच झालेले आहेत.

अखंड हिंदुस्थानाच्या साम्राज्ञी व श्री शाहू छत्रपतींच्या अभिषिक्त पट्टराणी !! तसेच सतीच्या प्रथेच्या नावाखाली दुर्दैवी अंत झालेल्या एक दुर्दैवी महाराणी !!

राजधानी सातारा येथे छत्रपती शाहू महाराज यांच्या उत्तरकाळांत जेंव्हा दत्तक प्रकरण उद्मले तेव्हा राजवाड्यांत कट-कारस्थानाला उत आला. आपल्या मर्जीचा दत्तक यावा म्हणून जो तो धडपड करू लागला.हे नेहमीच सगळीकडे घडत असते. छत्रपती शाहू महाराजांच्या धाकट्या राणीसाहेब सगुणाबाई या मोहिते घराण्यातील होत्या. दत्तक प्रकरणातील धुसफूस चालू असतानाच २५ ऑगस्ट १७४८ रोजी महाराणी सगुणाबाई यांचे निधन झाले.

छत्रपती शाहू महाराजांच्या अंत्यसमयी सकवारबाई साहेबांनी आपल्या देखरेखेखाली ठेवले होते. कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज(द्वितीय) यांनाच शाहू महाराजांनी दत्तक घ्यावे अशी सकवारबाई साहेबांची आग्रही भूमिका होती. ती चुकीची मुळीच वाटत नाही कारण छत्रपती संभाजी महाराज(द्वितीय) यांना या वेळेपर्यंत पस्तीस वर्ष राज्यकारभाराचा अनुभव प्राप्त झालेला होता. राज्याचा अधिपती होण्याची पात्रता आणि योग्यता त्यांनी निश्चितपणे संपादन केलेली होती. वारसाच्या दृष्टीनेही रामराजापेक्षा ते अधिक जवळचे होते.सकवारबाईसाहेबांची निवड नानासाहेब पेशवे यांना पटणे शक्यच नव्हते. कारण अशा अनुभवी छत्रपतीस निष्प्रभ केल्याशिवाय संपूर्ण मराठेशाही घशांत घालणे शक्यच झाले नसते. छत्रपतीच्या गादीवर नामधारी बसवायचा होता या दृष्टीकोनातून महाराणी ताराबाई साहेबांनी सुचविलेल्या रामराजे छत्रपती यांना गादीवर बसविणेच पेशव्याच्या पुढील चालीच्या दृष्टिने योग्य होते. त्यामुळे नानासाहेब पेशवेही आपले डाव धुर्तपणे खेळत होते. शेवटी कपट नितीने आपला डाव साधून महाराणी सकवारबाई साहेबावर विजय मिळवला. सकवारबाई यासारखी महत्वाकांक्षी बाई जिवंत राहिली तर आपले मनसुभे उधळून लावेल हे ओळखून तिला ठार मारण्याचा कट केला.

छत्रपती शाहू महाराज अत्यवस्थ असताना महाराणी सकवारबाई अखंड त्यांच्या उशाशी बसून होत्या. पण शरीर धर्मासाठी त्यांना उठून जावे लागत होते या संधीचा फायदा घेऊन बेशुद्धावस्थेतील छत्रपती शाहू महाराजांची सही दोन फर्मानावर घेण्यात आली. यामुळे छत्रपती शाहू महाराजांची सत्ता संपुष्ठात येऊन मराठेशाहीची सारी सत्ता पेशव्यांच्या हातात गेली. या दोन बनावट फर्मानावर पुढील पेशवाई साम्राज्य उभे राहिलेले आहे. ही गोष्ट इतिहास प्रमाणित आहे. कारण फर्मानावर मृत्युची वाट पहाणाऱ्या अस्वस्थ आणि बेशुद्ध छत्रपतीची मंजूरी घेण्यांत आली होती. १५ डिसेंबर १७४९ रोजी छत्रपती शाहू महाराज यांचे बेशुद्धावस्थेतच निधन झाले.सर्व कारभारी मंडळी ने बेसणीसदीय एकविचाराने ठरविले की, सकवारबाई साहेबास सती घालवावी.न जातील तर बढ़े न्यावी. आताच शेवट केला पाहिजेत. (संदर्भ: करवीर रियासत पृ. क्र. १६५ लेखक- स.मा.गर्गे)

पेशव्यांचा हस्तक गोविंदराव चिटणीस याने छ. शाहू महाराजांचे निधन होताच त्याने सकवारबाई साहेबांच्या सर्व माणसांना कैद केले. त्यात दादोबा प्रतिनिधी उर्फ जगजीवनराव, त्यांचा मुतालिक यमाजी शिवदेव इ.मंडळी होती.छत्रपती शाहू महाराजांच्या मृत्युनंतर तत्कालिन मराठा मंडळीने, सतिच्या गोंडस नावाखाली संगमताने केलेला हा एक भीषण खून! महाराणी सकवारबाई साहेब सती जायला सयार होईनांत म्हणून त्यांच्या माहेरच्या मंडळीना व विशेषतः वडिलांना आणून धमक्या देण्यांत आल्या. सदाशिव चिमणाजी याने सकवारबाई साहेबापुढे कुंकवाचा करंडा ठेवून कृष्णातिरी माहुली संगमावर सती जाण्याची तयारी करण्याची सुचना दिली. पेशवाईच्या उदद्यकाळी मराठेशाहीत सतीच्या गोंडस नावाखाली घडलेल्या या अमानुष सती प्रकरणाची कथा वाचताना अंगावर शहारे येतात.

महाराणी सकवारबाई साहेब ख-या अर्थाने सती होत्याच, अशी ग्वाही इतिहासांत मिळते, त्या छत्रपती शाहू महाराजांना ईश्वररूप मानत होत्या. त्याशिवाय त्यांच्या मनांत दुसरा भाव नव्हता. (संदर्भ :- करवीर रियासत पृ.क्र.१७३ लेखक- स.मा. गर्गे) छत्रपतीच्या घराण्यांत दुर्देवी ठरलेली आणि भयानक शेवट झालेली राजेशिर्के घराण्यातील ही कन्या! मतलबी इतिहासकारांकडे त्यांविषयी सहानभुतीचे दोन शब्द नसावेत याची खंत वाटते!