संहिता (चित्रपट)
२०१३ भारतीय चित्रपट | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
उच्चारणाचा श्राव्य | |||
---|---|---|---|
प्रकार | चलचित्र | ||
मूळ देश | |||
पटकथा | |||
दिग्दर्शक | |||
प्रकाशन तारीख |
| ||
| |||
संहिता: द स्क्रिप्ट (किंवा फक्त संहिता) हा २०१३ मधील भारतीय मराठी चित्रपट आहे जो सुमित्रा भावे-सुनील सुकथणकर या जोडीने दिग्दर्शित केला होता आणि अशोक अशोक मूव्हीजच्या सहकार्याने मुक्ता आर्ट्स निर्मित आहे. या चित्रपटात देविका दफ्तरदार, मिलिंद सोमण आणि राजेश्वरी सचदेव यांच्या मुख्य भूमिका असून उत्तरा बावकर आणि ज्योती सुभाष यांनी सहाय्क भूमिका केल्या आहेत. या चित्रपटाचे नाट्यप्रदर्शन १८ ऑक्टोबर २०१३ रोजी झाले आणि ६०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात दोन पुरस्कारांसह अनेक पुरस्कार जिंकले. आरती अंकलीकर-टिकेकर यांवा सर्वोत्कृष्ट महिला पार्श्व गायिका आणि शैलेंद्र बर्वे यांच्यासाठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन (गाणी) हे पुरस्कार मिळाले. दिग्दर्शक-निर्माता सुभाष घई, मुक्ता आर्ट्सचे संस्थापक, हे सुरुवातीला चित्रपटात नव्हते. पण जेव्हा दिग्दर्शक जोडीला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला तेव्हा त्यांच्याशी संपर्क साधला गेला.[१]
कथानक
रेवती साठे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त माहितीपट निर्माता आहे. निर्माते शिरीन दास्ताने रेवतीला एका लघूपटाचे दिग्दर्शन करण्यासाठी संपर्क साधते. तारा देउस्कर लिखित "दर्पण - द मिरर" या कथेवर चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची शिरीन यांचे पती दिनकर यांची इच्छा होती. परंतु एका दशकापासून ते अर्धांगवायू झाले असल्याने त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. शिरीन रेवतीला थोडक्यात कथा सांगते आणी म्हणते कि ही एका स्त्रीच्या आत्मसमर्पणांची कहाणी आहे. कथा राजा सत्यशिलची आहे ज्याची सावत्र आई त्याला आपल्या भाची मालविकासोबत लग्न लाऊन देते. पण राजाचे एका दरबारी गायिकेवर प्रेम जडते, जिचे प्रतिबिंब त्याच्या आत्म्याच्या आरशात तयार होते आणि ती प्रेमात राजाला शरण जाते.
रेवती तिच्या नियमित माहितीपटापासून वेगळे आव्हान म्हणून हा उपक्रम स्वीकारते आणि मूळ लेखिकेच्या मदतीने संहिता (स्क्रिप्ट) लिहिण्याची तयारी ठेवते. देउस्कर शिरीनबरोबर विरोधाभास करतात आणि त्याला दडपशाहीची कहाणी सांगतात आणि कथन सुरू करतात. १९४६ मध्ये हेरवाड राज्याच्या राजवाड्यात "दर्पण" सुरू होत आहे. सत्यशिलच्या मुलाच्या मुंजीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बनारस येथील गायिका रैना-बाई आपल्या गायिका कन्या भैरवीला घेऊन आल्या आहेत. भैरवीच्या अद्भुत गायनाने प्रभावित होऊन सत्यशिल तिच्या प्रेमात पडतो. मालविका ही इंग्रजी साहित्याची स्त्रीवादी आणि उत्साही वाचक असून, त्या दोघांच्या वाढत्या निकटपणाबद्दल तिला काहीच काळजी नसते. मालविका युरोपच्या सहलीवर असताना एका प्रसंगी, सत्यशिल भैरवीला शिकार प्रवासावर घेऊन जाते आणि ते सोबत रात्र व्यतीत करतात. दुसऱ्या दिवशी सत्यशील युरोपला जातो आणि भैरवी असे समजते कि तिला सोडून तो निघून गेला आहे. ती पण बनारसला जाते. परत आल्यावर सत्यशीलचा प्रशासनातला रस गमावतो. बऱ्याच वर्षांनंतर, ते मुंबईतील एका बैठकीला उपस्थित राहतात आणि चुकून भैरवीला भेटतो. सत्याशिलच्या चेहऱ्यावर असलेल्या खूणीसारखीच खूणी असलेली भैरवीची ७ वर्षाची मुलगी निशा पण सोबत येते.
सध्या, रेवती आपल्या पतीपासून घटस्फोटासाठी झगडत आहे कारण तिला तिची कारकीर्द घडवायची आहे. लघूपटा मध्ये हेमांगीनी ही भैरवीची भूमिका साकारणार आहे. तीला आपल्या प्रियकराच्या मुलीशी जुळवून घेणं कठीण जात आहे. आपले आश्वासन पाळण्यात एकही आपत्य नसल्याने दुःखासह शिरीन जगत आहे कारण दुसरा विवाह करताना दिनकरचे कुटुंबीय अशी अट घालतात. रेवती, हेमांगिनी, शिरीन आणि देउस्कर या चारही बायकांच्या मनात चित्रपटाचा वेगळा शेवट आहे. शिरीनच्या अनुसार शेवटी तीनही पात्रे विभक्त होणे आवश्यक आहे, परंतु हेमानगीनी असा विश्वास ठेवते की ते सर्व एकत्र राहतील. दुसरीकडे रेवतीच्या अनुसार वेगळा शेवट आहे ज्यात सत्यशिल व भैरवी एकत्र राहतात व राणी मालविका तरुण निशासमवेत युरोपमध्ये जाते आणि तिची काळजी घेतो. लेखक देउस्कर म्हणजेच वास्तविक जीवनातील निशा आहे, असा संकेत दिला आहे. हेमांगिनी तिच्या प्रियकराच्या मुलगीशी असलेल्या समस्या सोडवते. दिनकर मरण पावतो आणि रेवती रणवीरला घटस्फोट न देण्याचा निर्णय घेते.
कलाकार
- देविका दफ्तरदार - दिग्दर्शक रेवती आणिराणी मालविका
- मिलिंद सोमण - व्यापारी रणवीर शिंदे आणि हेरवाडचा राजा सत्यशील
- राजेश्वरी सचदेव - अभिनेत्री हेमांगीनी आणि गायिका भैरवी
- उत्तरा बावकर - लेखक तारा देउस्कर आणि सत्यशीलची सावत्र आई
- ज्योती सुभाष - निर्माता शिरीन दास्ताने आणि भैरवीची आई, रैना-बाई
- शरद भुताडीया - निर्माता दिनकर दास्तान आणि मालविकाचे पीता
पुरस्कार
संहिता १८ ऑक्टोबर २०१३ रोजी प्रसिद्ध झाली आणि कथा, दिग्दर्शन, संगीत या कामगिरीबद्दल त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला.[२][३] ६०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात चित्रपटाला दोन पुरस्कार मिळाले; आरती अंकलीकर-टिकेकर यांनी सादर केलेल्या "पलाकेना मुंदो" गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्व गायिका आणि शैलेंद्र बर्वे यांचे सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन (गाणी).[४] आधी अंकालीकर-टिकेकर यांनी २००६ मध्ये कोंकणी भाषा चित्रपट अंतर्नादमध्ये सादर केलेल्या सर्व गाण्यांसाठी ५४व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार जिंकला होता.[५] ११व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भावे यांना सर्वोत्कृष्ट पटकथाकार म्हणून गौरविण्यात आले. या चित्रपटाला २०व्या स्क्रीन अवॉर्ड्समध्ये चार नामांकने मिळाली; पण कोणताही पुरस्कार मिळू शकला नाही.
हा चित्रपट ४३वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, १४वा मुंबई चित्रपट महोत्सव आणि केरळमधील १७वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला होता.[६]
संदर्भ
- ^ Palit, Debarati (13 January 2013). "Marathi cinema gets a boost". Sakal Times. 12 January 2017 रोजी पाहिले.
- ^ Nandgaokar, Sunil (20 October 2013). "नेत्रसुखद, कर्णमधुर गुंतागुंतीची प्रेमकथा" [Visually stunning, melodious, yet complicated love story]. Loksatta (Marathi भाषेत). 11 January 2017 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "संहिता: नात्यांच्या उलगड्याची सोपी गोष्ट" [Samhita: Complicated relationships in a simple tale]. Maharashtra Times (Marathi भाषेत). 20 October 2013. 11 January 2017 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)[permanent dead link]
- ^ "60th National Film Awards Announced" (PDF) (Press release). Press Information Bureau (PIB), India. 18 March 2013 रोजी पाहिले.
- ^ "Pune's Arati Ankalikar-Tikekar bags National Award for second time". Daily News and Analysis. 19 March 2013. 19 June 2017 रोजी पाहिले.
- ^ "Marathi film Samhita selected for International Film Festival of India". Sify. 11 January 2017 रोजी पाहिले.
- "IFFK: Seven films in 'Indian Cinema Now' section". Hindustan Times. 7 November 2012. 11 January 2017 रोजी पाहिले.
- Shackleton, Liz (25 September 2012). "Mumbai film festival unveils competition sections". Screen Daily. 11 January 2017 रोजी पाहिले.[permanent dead link]