संस्थानांचे विलीनीकरण
१९४७मध्ये भारतातील प्रदेशांवर ब्रिटिशांची दोन प्रकारे सत्ता होती. काही प्रदेश थेट युनायटेड किंग्डमच्या आधिपत्यात होता तर इतर प्रदेश युनायटेड किंग्डमचे सार्वभौमत्व स्वीकारलेल्या ५००पेक्षा अधिक राजांच्या सत्तेखाली होता. या राजांच्या सत्तेतील संस्थानांना १५ ऑगस्ट, १९४७ रोजी तीन पर्याय होते - भारतात विलीन होणे, पाकिस्तानात विलीन होणे आणि स्वतंत्र राहणे. या संस्थानांना भारतात विलीन होण्यासाठी केले गेलेले प्रयत्न आणि प्रक्रिया ही भारतातील संस्थानांचे विलीनीकरण होय