Jump to content

संस्कृत महाकवी

संस्कृत भाषेत लेखन आणि काव्यरचना करणारे अनेक कवी होऊन गेले असले तरी त्यांपैकी ललितकाव्ये लिहिणाऱ्या चार कवींचा उल्लेख पुढील श्लोकात होतो. या श्लोकात प्रत्येक कवीचे वैशिष्ट्य सांगितले आहे. कालिदासाची उपमा, भारवी कवीची अर्थपूर्ण शब्दरचना, दंडी कवीचे पदलालित्य आणि माघ कवीमध्ये हे तीनही गुण आहेत.

उपमा कालिदासस्य । भारवेः अर्थगौरवम्‌ ।
दंडिनः पदलालित्यम्‌ । माघे सन्ति त्रयो गुणाः ॥

संस्कृत कवींची माहिती देणारी पुस्तके

  • कालिदास (लेखक : वा.वि. मिराशी)
  • कालिदास आणि शाकुंतल: एक अर्घ्यदान (लेखक - त्र्यं.वि. सरदेशमुख; संपादन कवी नीतीन वैद्य)
  • काव्यशास्त्राचा मापदंड - महाकवी कालिदास (लेखिका - सौ. पुष्पा गोटखिंडीकर)
  • महाकवी (डॉ.रामचंद्र देखणे)
  • महाकवी (कालिदासाच्या जीवनावरील मराठी कादंबरी; मूळ लेखिका - डॉ. जयश्री गोसावी महंत, अनुवाद : नीलिमा पटवर्धन)
  • महाकवी कालिदास (लेखक - कुंदन तांबे)
  • विश्ववंद्य महाकवी कालिदास (ना.द. जोशी)
  • संस्कृत कविचंपक (विष्णूशास्त्री चिपळूणकर)
  • संस्कृतकवी -दंडी
  • संस्कृतकवी -सुबंधु