संयोगभूमी
संयोगभूमी[१][श १] म्हणजे दोन विशाल भूखंडांना जोडणारा व दोन बाजूंना समुद्र किंवा अन्य जलाशय असलेला जमिनीचा चिंचोळा पट्टा होय. आशिया खंडातील अरबी द्वीपकल्प व आफ्रिका यांना जोडणारी सुएझ संयोगभूमी, उत्तर व दक्षिण अमेरिका या खंडांना जोडणारी पनामा संयोगभूमी, मलय द्वीपकल्पाला उर्वरित आग्नेय आशियाशी जोडणारी क्रा संयोगभूमी या जगातील महत्त्वाच्या संयोगभूमी आहेत.
पारिभाषिक शब्दसूची
- ^ संयोगभूमी (इंग्लिश: Isthmus, इस्थमस)
संदर्भ
- ^ कुलकर्णी, एल.के. भूगोलकोश.