Jump to content

संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम


संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम
United Nations Development Programme (इंग्रजी)
प्रकार कार्यक्रम
मुख्य हेलन क्लार्क
स्थिती कार्यरत
स्थापना इ.स. १९६५
मुख्यालय न्यू यॉर्क शहर
संकेतस्थळwww.undp.org
पालक संस्थाआर्थिक व सामाजिक परिषद

संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम हे संयुक्त राष्ट्रसंघातर्फे राबविण्यात येणारा एक प्रमुख विकास कार्यक्रम आहे.ह्या कार्यक्रमद्वारे जगातील १७७ देशांमध्ये नागरिकांना राहणीमान सुधारण्याची संधी उपलब्ध केली जाते. हा कार्यक्रम संयुक्त राष्ट्रे आमसभेच्या सहा विशेष बोर्डांपैकी एक असून तो आर्थिक व सामाजिक परिषदेच्या अखत्यारीत येतो.

हा कार्यक्रम संपूर्णपणे सदस्य देशांनी दिलेल्या ऐच्छिक देणग्यांमधून चालवला जातो. दारिद्र्य निर्मुलन, एच.आय.व्ही./एड्स इत्यादी रोगांचे उच्चाटन, लोकशाहीचा प्रसार तसेच मानवी हक्कांसाठी लढा इत्यादी अनेक लोकोपयोगी परियोजना यू.एन.डी.पी.मार्फत चालवल्या जातात.

रोनाल्डो, झिनेदिन झिदान, मारिया शारापोव्हा इत्यादी लोकप्रिय खेळाडू यू.एन.डी.पी.चा प्रसार करण्यासाठी राजदूत म्हणून नेमले गेले आहेत.

बाह्य दुवे

  • "संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम - अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)