संभाजी राजांची राजमुद्रा
छत्रपती संभाजी महाराजांच्या राजमुद्रेवरील संस्कृत मजकूर:
“ | श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते। यदंकस्येविनी लेखा वर्तते कस्यनोपरि।। | ” |
अन्वय:
“ | श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते। यदंकसेविनी लेखा वर्तते कस्यनोपरि।। | ” |
मराठीमध्ये अर्थ : शिवपुत्र श्री शंभु राजे यांची राजमुद्रा सूर्याच्या तेजाप्रमाणे आकाशी शोभते आहे. लोकांच्या कल्याणाकरिता तिचा अंमल सर्वत्र गाजणारा आहे. त्यासाठी ही मुद्रा सदैव प्रकाशमान आहे !