Jump to content

संदीप रघुनाथ सावंत

संदिप सावंत
जन्म मुंढे
मृत्यू ०१ जानेवारी २०२०
नौशेरा जम्मू सेक्टर
मृत्यूचे कारण शहीद
निवासस्थानमुंढे सातारा
टोपणनावे संदिप सावंत
शिक्षण १२ वी
प्रशिक्षणसंस्था भारतीय सेना
पेशा सैनिक
कारकिर्दीचा काळ २०११ ते १ जानेवारी २०२०
मूळ गावमुंढे सातारा
ख्याती सैनिक
पदवी हुद्दा नाईक
कार्यकाळ २०११ ते १ जानेवारी २०२०
जोडीदार सविता
अपत्ये मुलगी
शहीद जवान

जम्मू आणि काश्मीरमधील नौशेरा येथे पाकिस्तानी सैन्याशी दोन हात करताना शहीद झालेले महाराष्ट्राचे सुपुत्र शहीद संदीप रघुनाथ सावंत[] यांच्या पार्थिवार त्यांच्या मुंढे या मूळ गावी लष्करी इतमामात अत्यंसंस्कार करण्यात आले. या प्रसंगी संपूर्ण परिसरात शोकाकुल वातावरण पसरले होते. अवघे २५ वर्षे वय असलेस्या शहीद संदीप यांच्यामागे पत्नी सविता आणि एक दीड महिन्यांची मुलगी, आई-वडील असा परिवार आहे. शहीद संदीप सावंत यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सातारा आणि परिसरातील जनतेने अलोट गर्दी केली.शहीद नाईक संदीप सावंत यांचे पार्थिव जम्मू काश्मीरहून पुण्याला आणले गेले. त्यानंतर त्यांचे पार्थिव साताऱ्यातील कराड येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. तेथील नागरिकांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतल्यानंतर आज सकाळी त्यांचे पार्थिव त्यांचे मूळ गाव मुंढे येथे अंत्यदर्शनासाठी आणले गेले. येथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.इयत्ता १२ वीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर संदीप सावंत सन २०११ला भारतीय लष्करात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी राजस्थानमध्ये देशाची सेवा केली. त्यानंतर त्यांना जम्मू आणि काश्मीरमध्ये पाठवण्यात आले.नववर्षाच्या पहाटे संदीप यांच्या गस्ती चमूला नियंत्रण रेषेवरील जंगलात हालचाली दिसल्या. सावंत यांच्यासह अन्य गस्ती चमूतील अन्य सहकारी तात्काळ सज्ज झाले. त्यावेळी दहशतवादी घुसखोरी करीत असल्याचे दिसले. दाट धुके व कडाक्याच्या थंडीमुळे दहशतवाद्यांची नेमकी संख्या कळू शकत नव्हती. त्यामुळे नाईक संदीप यांनी आघाडीवर जात हल्ला चढवला. त्या दरम्यान झालेल्या गोळीबारात ते व नेपाळमधील गोरखा रायफल्सचे जवान अर्जुन थापा मगर हे गंभीर जखमी झाले. त्यात या दोघांना वीरमरण आले.दरम्यान, यानंतर संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली. त्यानंतर शोधमोहीम सुरू करून लपून बसलेल्या दहशतवाद्यांना हुडकून काढण्याचे काम हाती घेण्यात आले. त्या पूर्वी काही दिवस आधी नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. या वेळी भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले होते. जम्मू-काश्मीरमध्ये सन २०१९ मध्ये १६० दहशतवाद्यांना ठार करण्यात आले, तर १०२ दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याची माहिती जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी दिली.

शहिद

साताऱ्याचे जवान संदीप सावंत नौशेरा हल्ल्यात शहीद मराठा लाईट इंफ्रंट्रीतील जवान नाईक संदीप रघुनाथ सावंत नौशेरा (जम्मू सेक्टर) येथे झालेल्या चकमकीत हुतात्मा झाले. ते सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील मुंडे गावचे रहिवासी होत. २५ वर्षीय संदीप यांच्यामागे पत्नी सविता या आहेत.नववर्षाच्या पहाटे संदीप यांच्या गस्ती चमूला नियंत्रण रेषेवरील जंगलात हालचाली दिसल्या. सावंत यांच्यासह अन्य गस्ती चमूतील अन्य सहकारी तात्काळ सज्ज झाले. त्यावेळी दहशतवादी घुसखोरी करीत असल्याचे दिसले. दाट धुके व कडाक्याच्या थंडीमुळे दहशतवाद्यांची नेमकी संख्या कळू शकत नव्हती. त्यामुळे नाईक संदीप यांनी आघाडीवर जात हल्ला चढवला. त्या दरम्यान झालेल्या गोळीबारात ते व नेपाळमधील गोरखा रायफल्सचे जवान अर्जुन थापा मगर हे गंभीर जखमी झाले. त्यात या दोघांना वीरमरण आले.दरम्यान, यानंतर संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. शोधमोहीम सुरू असून लपून बसलेल्या दहशतवाद्यांना हुडकून काढण्याचे काम सुरू आहे. काही दिवसांपूर्वी नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. या वेळी भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले होते. जम्मू-काश्मीरमध्ये सन २०१९ मध्ये १६० दहशतवाद्यांना ठार करण्यात आले, तर १०२ दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याची माहिती जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी दिली.

हे ही पहा

बाह्य दुवे

  1. ^ "साताऱ्याचे जवान संदीप सावंत नौशेरा हल्ल्यात शहीद". Maharashtra Times. 2020-01-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-01-11 रोजी पाहिले.