Jump to content

संदीप उन्नीकृष्णन

संदीप उन्नीकृष्णन സന്ദീപ് ഉണ്ണിക്കൃഷ്ണ
जन्म १५ मार्च इ.स. १९७७
कोळिकोड केरळ
मृत्यूनोव्हेंबर २७, २००८
ताज हॉटेल, मुंबई
मृत्यूचे कारण२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
शिक्षण बॅचलर ऑफ आर्ट्स (एन्.डी.ए.)
प्रशिक्षणसंस्थाराष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी
पेशा राष्ट्रीय सुरक्षा गार्ड
कारकिर्दीचा काळइ.स. १९९९-इ.स. २००८
मालकभारतीय लष्कर
प्रसिद्ध कामेऑपरेशन टॉरनॅडो मध्ये शहीद
पदवी हुद्दा मेजर
वडील के. उन्नीकृष्णन
आई धनलक्ष्मी
पुरस्कार अशोक चक्र(२००९)


मेजर संदीप उन्नीकृष्णन (- नोव्हेंबर २६, इ.स. २००८:मुंबई) हे एन.एस.जी. कमांडोचे अधिकारीहोते. नोव्हेंबर २६, इ.स. २००८ रोजी मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात संदीप उन्नीकृष्णन यांनी वीरमरण पत्करले. २६ जानेवारी २००९ रोजी त्यांना अशोक चक्र हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांचे शेवटचे शब्द म्हणजे : "तुम्ही वर येऊ नका , मी सगळं सांभाळतो." हे शब्द त्यांनी त्यांच्या माणसांना त्यांच्यावर गोळीबार होताना उद्गारले. हे सगळे ताज महाल या हॉटेलमध्य घडले. [म्हणजेच एन.सी.जी.च्या black tornado operation चालू असताना.]

परिवार

संदीप उन्नीकृष्णन यांची आई धनलक्ष्मी, अशोक चक्र पदक स्वीकारताना.

संदीप हा इस्त्रोचे निवृत्त ऑफिसर के. उन्नीकृष्णन व धनलक्ष्मी उन्नीकृष्णन यांचा एकुलताएक सुपुत्र होता. त्यांचा परिवार हा आधी बंगळूरू येथे स्थायित होता. परंतु नंतर ते केरळ मध्ये स्थायित झाले.