संतोष संखद
संतोष संखद | |
---|---|
जन्म | संतोष भीमराव संखद ९ मार्च, १९७८ पुणे, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
पेशा | चित्रपट दिग्दर्शक |
राजकीय पक्ष | वंचित बहुजन आघाडी |
संतोष भीमराव संखद ( पुणे; ९ मार्च १९७८) हे एक मराठी चित्रपट दिग्दर्शक, कलादिग्दर्शक व नृत्यदिग्दर्शक आहेत. इ.स. १९९८ पासून ते चित्रपट क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी ६० पेक्षा अधिक चित्रपटांत दिग्दर्शक, कलादिग्दर्शक किंवा नृत्यदिग्दर्शक म्हणून काम केले आहे. तसेच ते वंचित बहुजन आघाडीचे एक प्रवक्ता सुद्धा आहेत.[१]
जीवन
कारकीर्द
कलादिग्दर्शित आणि नृत्यदिग्दर्शित चित्रपट
संतोष संखद यांनी सैराट, फँड्री, कासव, निळकंठ मास्तर, १०वी फ, वास्तुपुरुष, देवराई, बाधा, एक कप च्या, घो मला असला हवा, नटी, नितळ, सुरसपाटा, ट्रिपल सीट, प्रेमाची गोष्ट, मामाच्या गावाला जाऊ या, लडतर, अस्तु, हा भारत माझा, फिर जिंदगी, मोर देखणे जंगल मे, बेवक्त बारिश, संहिता, आणि इतर ४०पेक्षा अधिक चित्रपटांचे कला दिग्दर्शन आणि नृत्य दिग्दर्शन केले आहे.[२][३][४]
पुरस्कार
संखद यांना १५० पेक्षा अधिक पुरस्कार प्रदान केले गेले आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत.
- दादासाहेब फाळके पुरस्कार
- प्रभात पुरस्कार
- झी गौरव
- सम्यक पुरस्कार
- नृत्य जीवन गौरव
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल फेलोशिप अवॉर्ड
- कलागौरव पुरस्कार
- प्रेरणा पुरस्कार
संदर्भ
- ^ author/lokmat-news-network (2019-02-24). "वंचित बहुजन आघाडीचे १६ प्रवक्ते घोषित!". Lokmat. 2020-06-04 रोजी पाहिले.
- ^ "मामाच्या गावाला जाऊ या". मराठी चित्रपट सूची (इंग्रजी भाषेत). 2020-06-04 रोजी पाहिले.
- ^ "नटी". मराठी चित्रपट सूची (इंग्रजी भाषेत). 2020-06-04 रोजी पाहिले.
- ^ "राष्ट्रीय पुरस्कार विजेता 'संहिता - The Script' येत्या 11 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला". Divya Marathi. 2020-06-04 रोजी पाहिले.