संजीवनी देशमुख
संजीवनी अरविंद देशमुख (१२ सप्टेंबर, १९४५:नागपूर - ) या एक मराठी लेखिका आहेत.
देशमुख यांनी हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून १९६२ साली बी.एस्सी. व १९७२ साली एम.ए. केले. त्यानंतर त्या नागपूर विद्यापीठाच्या पीएच्.डी. झाल्या. त्या गांधर्व महाविद्यालयाच्या संगीत विशारद आहेत. यवतमाळच्या अणे महिला महाविद्यालयात त्या मराठी विषयाचे अध्यापन करीत. पुढे तेथे त्या मराठीच्या शाखाप्रमुख झाल्या.
देशमुख या एक कादंबरीकार, कथालेखक आणि संशोधनपर लिखाण कराणाऱ्या मराठी साहित्यिक आहेत. त्यांनी सुमारे ३३ अभंगही रचले आहेत, ते पुस्तकरूपात प्रकाशित झालेले नाहीत.
माया सरदेसाई या संजीवनी देशमुख यांच्या आई होत.
पुस्तके
- अग्निफुलं (कादंबरी, १९७५)
- अपरिमिता (कादंबरी, १९७७)
- कॅरॅक्टर (कथासंग्रह, १९८२)
- तंजावरच्या भोसले राजांची नाटके (संशोधनपर लेखन, १९९३, सहलेखिका माया सरदेसाई)
- विफल (कादंबरी, १९७६)
- स्वप्नात नाही आले (कादंबरी, १९७३)
- ही तर मीरा गाते (कादंबरी, १९७३)
सन्मान
- यवतमाळ जिल्हा महिला साहित्य संघाच्या अध्यक्ष (१९९४)