संजय मिश्रा
संजय मिश्रा | |
---|---|
संजय मिश्रा (२०१२) | |
जन्म | ६ ऑक्टोबर, १९६३ दरभंगा, बिहार[१] |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कारकीर्दीचा काळ | १९९१ - आजतागायत |
पत्नी |
|
अपत्ये | २ |
संजय मिश्रा (जन्म:६ ऑक्टोबर १९६८) हा एक भारतीय अभिनेता आहे जो प्रामुख्याने हिंदी चित्रपट आणि दूरचित्रवाहिनी मधील त्याच्या कामांसाठी ओळखला जातो.[२] नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे माजी विद्यार्थी, त्यांनी १९९५ च्या 'ओह डार्लिंग ये है इंडिया!' चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. नंतरच्या चित्रपटांमध्ये 'राजकुमार' (१९९६) आणि 'सत्या '(१९९८) यांचा समावेश आहे. इ.स. १९९९ साल च्या क्रिकेट विश्वचषकादरम्यान ईएसपीएन स्टार स्पोर्ट्स मध्ये 'ॲपल सिंग' म्हणूनही तो दिसला.[३][४] २०१५ मध्ये, 'अँखों देखी' मधील अभिनयासाठी त्याला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता समीक्षक पुरस्कार मिळाला.[५]
मिश्रा यांचा जन्म दरभंगा, साक्री, नारायणपूर, बिहार येथे राहणाऱ्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. मिश्रा यांचे वडील शंभू नाथ मिश्रा प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोमध्ये कर्मचारी होते आणि त्यांचे दोन्ही आजोबा भारतीय नागरी सेवक होते. जेव्हा त्याच्या वडिलांची बदली झाली तेव्हा ते वाराणसीला गेले, जिथे त्यांनी केंद्रीय विद्यालय BHU मध्ये शिक्षण घेतले. मिश्रा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये सामील झाले आणि 1989 मध्ये पदवीधर झाले.[६]
संदर्भ
- ^ "A happy homecoming for Sanjay Mishra - Times of India". The Times of India.
- ^ Kumar, Anuj (20 March 2014). "Man of real character" – www.thehindu.com द्वारे.
- ^ "ESPN adopts Apple Singh as the face of the channel". 2013-09-18 रोजी पाहिले.
- ^ "Politics of comedy". 2013-09-18 रोजी पाहिले.
- ^ "Sanjay Mishra on why he takes up every role that comes his way". The Indian Express. 20 March 2014. 2014-04-18 रोजी पाहिले.
- ^ "Many people don't know me by my name but by the characters that I have played: Sanjay Mishra". Gaon Connection. 2022-12-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-04-22 रोजी पाहिले.