संजय कुमार (सैनिक)
संजय कुमार | |
---|---|
संजय कुमार आपल्या परमवीर चक्र पुरस्कारासह | |
मातृभाषेतील नाव | संजय कुमार |
जन्म | ३ मार्च, १९७६ कलोल बकैं, बिलासपूर जिल्हा, हिमाचल प्रदेश |
Allegiance | |
सैन्यशाखा | भारतीय सेना |
हुद्दा | नायब सुबेदार |
सैन्यपथक | १३ जम्मू काश्मीर रायफल्स |
लढाया व युद्धे | कारगिल युद्ध |
पुरस्कार | परमवीरचक्र |
नायब सुबेदार संजय कुमार (३ मार्च, १९७६:कलोल बकैं, बिलासपुर जिल्हा, हिमाचल प्रदेश, भारत - ) हे भारतीय सैन्यातील जुनियर कमिशन्ड अधिकारी[मराठी शब्द सुचवा] आहेत. कारगिल युद्धातील कामगिरीसाठी त्यांना परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च लष्करी बहुमान दिला गेला.
पूर्वजीवन
लष्करात भरती होण्यासाठी संजय कुमार यांनी केलेला अर्ज तीन वेळा नाकारला गेला होता. चौथ्यांदा अर्ज केल्यावर त्यांना लष्करात भरती केले गेले. यादरम्यान ते नवी दिल्लीमध्ये टॅक्सी चालवित असत.
संदेश
कारगिल युद्धाच्या ऐन मध्यावर ४ जुलै, १९९९ रोजी संजय कुमार आपल्या जम्मू काश्मीर रायफल्सच्या १३व्या बटालियनमधील तुकडीचे नेतृत्व करीत एरिया फ्लॅट टॉप या भागाची टेहळणी करीत होते. पाकिस्तानी सैनिकांच्या ताब्यात असलेल्या या ठिकाणी जाण्यासाठी संजय कुमार कडा चढून गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की तेथील पाकिस्तानी ठाण्यावर मोठी कुमक होती. नंतर होऊ घातलेल्या जम्मू काश्मीर रायफल्सच्या आक्रमण या ठाण्याने सहज कापून काढले असते. हे पाहून ते एकटे कड्यावरून पुढे सरकले आणि ठाण्याच्या एका बाजूस जाउन त्यांनी एकांडा एल्गार केला. ते पाहताच पाकिस्तान्यांनी त्यांच्यावर मशिनगनचा मारा केला. पहिल्या काही पावलांतच संजय कुमार यांच्या हातावर आणि छातीत गोळ्या घुसल्या. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांनी शत्रूचे बंकर गाठले आणि तीन पाकिस्तानी सैनिकांना हातोहातच्या लढाईत यमसदनी धाडले. यानंतर त्यांनी तेथील एक मशिनगन उचलली आणि शत्रूच्या दुसऱ्या बंकरकडे गेले. अचानक आलेल्या या हल्ल्याने गांगरून गेलेले पाकिस्तानी सैनिक काही करण्याच्या आत संजय कुमारांनी त्यांना ठार मारले. हे पाहून चवताळलेल्या भारतीय सैनिकांच्या प्लाटूनने हल्ला चढवला आणि उरलेल्या पाकिस्तानी सैनिकांना ठार करीत आणि पळवून लावीत एरिया फ्लॅट टॉप काबीज केला.
संजय कुमार यांच्या अतुलनीय पराक्रमासाठी त्यांना परमवीर चक्र देण्यात आले.