Jump to content

संगीत सौभद्र

संगीत सौभद्र या नाटकाचा पहिला प्रयोग १८ नोव्हेंबर, इ.स. १८८२ या दिवशी पुण्याच्या पूर्णानंद थिएटरात झाला.[]

नाटकः संगीत सौभद्र

लेखक : बलवंत पांडुरंग तथा बळवंत पांडुरंग किर्लोस्कर
साल: इ.स. १८८२
पात्रे :

  • अर्जुन
  • कुसुमावती
  • गर्गमुनी
  • नटी
  • नारद
  • बलराम
  • रुक्मिणी
  • विदूषक
  • श्रीकृष्ण
  • सारंगनयना
  • सुभद्रा
  • सूत्रधार



या नाटकातली गाजलेली पदे

पात्र: नारद

राधाधरमधुमिलिंद जयजय । रमारमण हरि गोविंद ॥ धृ ॥
कालिंदी तट पुलिंद लांच्छित सुरनुतपादारविंद । जयजय ॥ 1 ॥
उद्‌धृतनग मध्वरिंदमानघ सत्यपांडपटकुविंद । जयजय ॥ 2 ॥
गोपसदनगुर्वलिंदखेलन बलवत्स्तुतिते न निंद । जयजय ॥ 3 ॥

पात्र: नारद

पार्था, तुज देउन वचनें ।
फसविले पहा मुकुंदानें ॥ ध्रु ॥
सार्वभौम दुर्योधननृपती ।
लक्ष्मी त्याची आणुनी चित्तीं ।
त्यजिले तुज अवमानें ॥ 1 ॥

पात्र: नारद

पावना वामना या मना ।
दे तव भजनीं निरंतर वासना ॥ ध्रु ॥
श्रीवत्सांकित कौस्तुभधारिण ।
योगिजनांतररंजना ॥ 1 ॥
भो प्रल्हादपरा हरिरूपा ।
मत्तनिशाचरकंदना ॥ 2 ॥
नवतुलसीदलमालाभूषा ।
बलवद भवभयभंजना ॥ 3 ॥

पात्र: सुभद्रा

बलसागर तुम्ही वीरशिरोमणी कोठेंतरी रमलां ।
आश्वासन जिस दिले तिला कां विसरुनियां गेलां ॥ धृ ॥
पेरियलें जें प्रीतितरुचें बीज ह्रुदयिं त्याला ।
अंकुर येउनि सुदृढ तयाचा वृक्ष असे झाला ।
सुंदर तुम्ही मूर्तिमान तच्छायेला बसलां ।
चित्र असे हृदयांत कोंदतां ठाव न अन्याला ॥

अन्य पदे

  • अर्जुन तर संन्यासि हो‍उनी
  • अति कोपयुक्‍त होय परि
  • अरसिक किती हा शेला
  • किती सांगुं तुला मज
  • कोण तुजसम सांग
  • कांते फार तुला मजसाठीं
  • गर्गगुरूतें घेतलें वश
  • जेव्हां जेव्हां वाढायातें
  • ज्यावरिं मीं विश्‍वास ठेविला
  • तस्कराहातीं द्विजगोधन
  • दिसलि पुनरपी गुप्त जाहली
  • नच सुंदरि करूं कोपा
  • नभ मेघांनीं आक्रमिलें
  • नमुनि ईशचरणा
  • नाहीं झाले षण्मास मला
  • नीरक्षीरालिंगनरूपी स्‍नान
  • नेमियलें मज शत्रुजयाला
  • परम सुवासिक पुष्पें
  • पुष्पपरागसुगंधित शीतल
  • पांडुकुमारा पार्थ नरवरा
  • पांडुनृपति जनक जया
  • प्रिया सुभद्रा घोर वनीं
  • प्रिये पहा
  • बघुनि सुभद्रेला
  • बहुत छळियलें नाथा
  • बहुत दिन नच भेटलों
  • भूमि जल तेज पवमान
  • मन्नेत्र गुंतले लुब्ध
  • माझी मातुलकन्यका
  • माझ्या मनिचे हितगुज सारे
  • माझ्यासाठीं तीनें अन्न
  • मी कुमार तीहि कुमारी
  • मोडुनि दंडा फेंकुन देइन
  • लग्नाला जातों मी
  • लाल शालजोडी जरतारी
  • वद जाउं कुणाला शरण
  • वदनीं घर्मजलाला
  • वसंतीं बघुनि मेनकेला
  • वाटे सर्वथा मुक्‍त झालों
  • व्यर्थ मीं जन्मलें थोर
  • शशिकुलभूषण सदया
  • होतों द्वारकाभुवनीं

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ संजय वझरेकर (१८ नोव्हेंबर २०१३). "नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत". लोकसत्ता. ५ डिसेंबर २०१३ रोजी पाहिले.

बाह्य दुवे