Jump to content

संगीत शारदा

Sangeet Sharada (en); संगीत शारदा (mr) play (en); मराठी संगीतनाटक (mr); п'єса (uk)
संगीत शारदा 
मराठी संगीतनाटक
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारसाहित्यिक कार्य
लेखक
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

संगीत शारदा हे नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेले आणि दिग्दर्शित केलेले १८९९ मधील मराठी संगीत नाटक आहे. [] भारतातील नाट्य साहित्य, मुख्यत्वे ऐतिहासिक-पौराणिक कथनांवर केंद्रित असताना, सामाजिक समस्या दाखवणारे आणि बालविवाहाचा विषय हाताळणारे व नेहमिचे नियम मोडणारे हे मराठीतील पहिले नाटक मानले जाते.[] []

कालांतराने, बाल गंधर्व, विष्णुपंत पागनीस, [] भालचंद्र पेंढारकर [] यांसारख्या विविध रंगमंचावरील कलाकारांनी शारदाची मुख्य भूमिका साकारली आहे. संगीत नाटकाच्या स्वरूपानुसार, या नाटकात ५० हून अधिक गाणी होती, जी स्वतः देवल यांनी लिहिली आणि संगीतबद्ध केली होती.[]

हे नाटक "भारतातील सामाजिक नाटकातील अग्रगण्य मानले जाते".[] ह्या नाटकाने लोकप्रियता अशा प्रकारे मिळवली की जेव्हा हरीबिलास सारडा यांनी प्रस्तावित केलेला बालविवाह प्रतिबंध कायदा, (१९२९ मध्ये कायदा संमत झाला) ज्याला "सारडा कायदा" देखील म्हणत असे, त्याला चूकून अनेक वेळा '‘शारदा कायदा’' असे नाव पडले.[]

कथानक

भुजंगनाथ हा एक वृद्ध विधुर आहे व त्याला आणखी एकदा लग्न करायचे आहे जेणेकरून त्याला त्याच्या मालमत्तेचा वारस मिळू शकेल. हा भद्रेश्वर दीक्षित या मध्यस्थांशी मैत्री करतो, जो त्याला तरुण वधू शोधण्यात मदत करेल. गावातील एक प्रसिद्ध व्यक्ती असूनही, दीक्षित यांना भुजंगनाथसाठी वधू मिळण्यात अडचणी येतात, कारण त्यांच्या वृद्धत्वामुळे कोणीही प्रस्तावासाठी सहमत नाही. दीक्षित भुजंगनाथला वधू शोधण्यासाठी इतर गावांना भेट देण्यास पटवून देतात आणि त्यांना श्रीमंत व्यक्तीप्रमाणे वागण्याचा सल्ला देतात, ज्यामुळे भुजंगनाथसाठी वधू मिळवणे सोपे होईल.

कोदंड या तरुण अनाथ पुरोहितासोबत दोघेही गाणगापूरला भेट देतात आणि गावातील लोकांना हे पटवून देतात की भुजंगनाथ एक श्रीमंत आणि तरुण माणूस आहे. आपली तरुण मुलगी शारदा हिचे लग्न एका श्रीमंत व्यक्तीशी करू इच्छिणाऱ्या कांचनभटला ही बातमी कळते. सुवर्णशास्त्री नावाच्या एका मित्राच्या मदतीने तो दीक्षितशी संपर्क साधतो आणि जेव्हा दीक्षितने लग्नात हुंडा म्हणून ५००० देण्याचा प्रस्ताव दिला तेव्हा तो प्रस्ताव सहज स्वीकारतो. इंदिराकाकू, कांचनभटची पत्नी आणि शारदाची आई, जेव्हा तिला भुजंगनाथबद्दल सत्य समजते तेव्हा लग्नासाठी सहमत नसते. कोदंड जेव्हा दीक्षितसह कांचनभटच्या घरी जातो तेव्हा तो लग्नाला विरोध करतो आणि दीक्षित आणि भुजंगनाथ यांना धमकी देतो की मी सत्य सांगेन आणि पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल करणार आहे कारण प्रस्तावित विवाह वृद्ध व्यक्ती आणि किशोरवयीन यांच्यात नियोजित आहे. घाबरलेला दीक्षित कोदंडला तळघरात बंद करतो.

कोदंड बेपत्ता झाल्याने गावकरी भुजंगनाथ आणि दीक्षित यांची चौकशी करू लागले. शारदा, भुजंगनाथला प्रत्यक्ष भेटून लग्नाला विरोध करते पण तिचे वडील कांचनभट लक्ष देत नाहीत आणि लग्नाची तयारी सुरू करतात. एका मित्राच्या मदतीने कोदंड कोठडीतून पळून जाण्यात यशस्वी होतो.

लग्नाच्या दिवशी कोदंड पोलिसांसह लग्नाच्या ठिकाणी पोहोचतो आणि भुजंगनाथ आणि दीक्षितचा पर्दाफाश करतो. पोलिसांनी दोघांना अटक केली. शारदा घटनास्थळावरून पळून जाते आणि आत्महत्या करण्याचा निर्णय घेते. पण कोदंड शारदाला पटवून लग्नासाठी मागणी घालतो. शारदा हा प्रस्ताव स्वीकारते आणि दोघे लग्न करण्याचा निर्णय घेतात.

पात्र

नाटकात असंख्य पात्रे होती. त्यांच्यापैकी काहींची गाणीही होती जी त्यांनी स्वतःच सादर केली होती.

  • श्रीमंत भुजंगनाथ - ७५ वर्षीय विधुर
  • कोदंड - एक अनाथ पुरोहित आणि पुरुष नायक
  • शारदा - एक किशोरवयीन, तरुण वधू आणि स्त्री नायीका
  • कांचनभट - शारदाचे वडील
  • इंदिराकाकू - शारदाची आई
  • भद्रेश्वर दीक्षित - एक मध्यस्थ
  • जयंत - शारदाचा धाकटा भाऊ
  • जान्हवी, शरयू, वल्लरी, मंदाकिनी, त्रिवेणी आणि तुंगा - शारदाच्या मैत्रिणी

समाजातील स्थान

संगीत शारदा रंगभूमीवर येण्यापूर्वी मराठी रंगभूमीवर ऐतिहासिक आणि पौराणिक कथा असलेली नाटके लोकप्रिय होती. समाजातून बालविवाह रद्द करण्याचा संदेश देणारे हे नाटक १८९९ मध्ये "भारतातील सामाजिक नाटकातील अग्रगण्य" ठरले.[] या नाटकाला अशाप्रकारे लोकप्रियता मिळाली की जेव्हा बालविवाह प्रतिबंध कायदा, ज्याला "सारडा कायदा" देखील म्हणले जाते, तेव्हा कायद्याचे नाव हे "शारदा कायदा" आहे असे चूकीने म्हणले जात. , हा कायदा हरिबिलास सारडा यांनी प्रस्तावित केला होता आणि प्रत्यक्षात त्यांच्या आडनावावरून त्याला "सारडा कायदा" असे म्हणले जात असे. हा २८ सप्टेंबर १९२९ रोजी पारित झाला.[]

नाटकातील गाणी आजही लोकप्रिय आहेत. २०११ च्या बालगंधर्व या मराठी चित्रपटात "म्हातारा इतुका ना अवघे पाउणशे वयमान" हे गाणे वापरले होते. जानेवारी २०१२ मध्ये, संगीत शारदा - एक रिॲलिटी शो या नाटकाची आधुनिक आवृत्ती मुंबईत रंगली. पुनरुज्जीवित नाटकाने या नाटकाला आधुनिक दृष्टीकोन दिला. मूळ नाटकातील सर्व गाणी वापरली गेली; काहींनी त्यात संगीताचा नवीन प्रकार वापरला. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हे नाटक रंगवले होते.[] २०११ मध्ये या नाटकाचे ब्रेल लिपीमध्ये लिप्यंतरही करण्यात आले.[]

योगायोगाने २१ डिसेंबर १९०९ रोजी विजयानंद नाट्यगृह, नाशिक येथे नाटक सादर होत असताना, नाशिकचे तत्कालीन ब्रिटिश कलेक्टर आर्थर मॅसन टिपेट्स जॅक्सन यांची स्वातंत्र्यसैनिक अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी गोळ्या झाडून हत्या केली.[१०] अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या किर्लोस्कर नाटक मंडळीतर्फे हे नाटक सादर केले जात होते आणि त्यात शारदाची प्रमुख भूमिका बाल गंधर्व सादर करत होते. हे दृश्य २०११ च्या बालगंधर्व चित्रपटात देखील दाखवले आहे.[११]

पुढील वाचन

संदर्भ

  1. ^ a b c Gokhale, Shanta (April 15, 2009). "Beyond entertainment: Sangeet Sharada". Mumbai Mirror. Mumbai. The Times of India. July 2, 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 17, 2012 रोजी पाहिले.
  2. ^ Datta, Amaresh (1988). Encyclopaedia of Indian Literature: Devraj to Jyoti. South Asia Books. ISBN 978-8172016494. June 17, 2012 रोजी पाहिले.
  3. ^ Kasbekar Richards, Asha (2006). Pop Culture India!: Media, Arts, and Lifestyle. ABC-CLIO. p. 336. ISBN 978-1851096367. June 17, 2012 रोजी पाहिले.
  4. ^ "Stars: Vishnupant Pagnis (1892-1943)". July 6, 2012 रोजी पाहिले.
  5. ^ "Bapurao Pendharkar". June 17, 2012 रोजी पाहिले.
  6. ^ Priya, Shashi (April 7, 2009). "Play on". Indian Express. June 17, 2012 रोजी पाहिले.
  7. ^ a b Sahani, Alaka (July 11, 2011). "The Revival Drama". The Indian Express. June 17, 2012 रोजी पाहिले.
  8. ^ Manisha Nitsure Joshi (January 13, 2012). "आजची 'शारदा' येतेय!". Maharashtra Times (Marathi भाषेत). Mumbai. 2014-01-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 25, 2012 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  9. ^ Chatterjee, Swasti (December 6, 2011). "Compilation of five classic Marathi plays in Braille script released". Pune. The Indian Express. June 17, 2012 रोजी पाहिले.
  10. ^ Dr. Saral Dharankar. "अनंत कान्हेरे पराक्रम दिनाची परिणामकारकता" (Marathi भाषेत). Nasik: Loksatta. June 25, 2012 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  11. ^ Y. D. Phadke (April 18, 2008). "कारनामा क्रांतिकारक कान्हेरेंचा..." Maharashtra Times (Marathi भाषेत). Mumbai. 2008-05-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 25, 2012 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)