Jump to content

संगीता शंकर

संगीता शंकर
आयुष्य
जन्म १२ ऑगस्ट १९६५
जन्म स्थान बनारस
संगीत कारकीर्द
कार्य व्हायोलीन वादन
पेशा वादक/ संगीत दिग्दर्शक
बाह्य दुवे
संकेतस्थळ

डॉ.संगीता शंकर ह्या भारतीय व्हायोलीन वादक आहेत. त्या बनारस येथे एका सांगीतिक कुटुंबात जन्माला आल्या. त्यांची आई एन. राजम ह्या विख्यात व्हायोलीन वादक आहेत.[] आणि टी.एस. सुब्रमणीयन हे त्यांचे वडील आहेत. संगीता ह्यांनी लहान वयात आपल्या आईकडे व्हायोलीन शिक्षणाला सुरुवात केली. लोक त्यांच्या संगीत पद्धतीला 'गाणारे व्यायोलीन' म्हणून ओळखतात. त्यांचे मामा टी.एन. कृष्णन हेसुद्धा व्हायोलीन वादक तर त्यांच्या कन्या रागिणी शंकर आणि नंदिनी शंकर ह्या व्हायोलीन वादक आहेत.[]

शिक्षण

संगीता शंकर ह्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून संगीतातील पदवी प्राप्त केली आहे.[]तेथूनच त्यांनी संगीतात डॉक्टरेट मिळवली.

कारकीर्द

त्यांनी वयाच्या आठव्या वर्षी दूरदर्शन वरील कार्यक्रमासाठी व्हायोलीन वादन केली ज्यामध्ये झाकीर हुसेन ह्यांनी त्यांना तबल्याची साथ केली.[][] त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी त्यांच्या आईबरोबर वाजवायला सुरुवात आणि वयाच्या सोळाव्या वर्षी एकल वादन केले.[] संगीता ह्यांनी १९८४-८५ मध्ये वाराणसी मध्ये नवीन कलाकारांसाठी एका महोत्सवाचे(नाव-अभिनव) आयोजन केले होते. त्यांनी फक्त वेगवेगळ्या राज्यातच नाही तर जगभारत आपली कला सादर केली आहे. त्यापैकी काही आहेत अमेरिका, कॅनडा, रशिया, हॉलंड, जपान, सिंगापूर आणि इतर. त्या गायकी अंगाचे व्हायोलीन वाजवतात.[] २००६ मध्ये त्यांनी एक २६ भागांची टी.व्ही. सिरीयल ‘स्वर साधना’ केली होती. ह्या सिरीयलचे आयोजन भारतीय संगीत सर्वांपर्यंत पोहोचावे ह्यासाठी होते. यामध्ये काही उत्तम कलाकार होते; माधुरी दीक्षित,जावेद अख्तर, झाकीर हुसेन, बिरजू महाराज,जगजीत सिंग, नौशाद, अमोल पालेकर, पंकज उधास, युक्ता मुखी, कनक रेळे, सुरेश वाडकर, एन. राजम, साधना सरगम, शंकर महादेवन, अन्नू कपूर, वीणा सहस्त्रबुद्धे आणि इतर.

त्यांच्या अपार कौशल्यामुळे त्यांना विविध प्रकारच्या संगीतामध्ये योगदान करता आले आहे उदाहरणार्थ हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत, गझल,गीत ,भजन, लहान मुलांसाठी गाणी, फ्युजन ,रिंगटोन इ.

प्रकाशित ध्वनी मुद्रिका

  1. ताबूला रस (फ्युजन) विश्व मोहन भट आणि बेला फ्लेक ह्यांच्या बरोबर. ह्या मुद्रीकेला १९९७ साली ग्रामी पुरस्कारसाठी नामांकन मिळाले होते.[]
  2. झाकीर हुसेन ह्यांच्याबरोबर मेलडी & रिदम
  3. एन. राजम ह्यांच्या बरोबर व्हायोलीन डायनास्टी (राग बागेश्री)
  4. आशा (राग जोग)
  5. कुमारी संगीता (राग बिहाग, छायानट)
  6. सेन्सिटिव्ह स्ट्रेंन्स ऑफ व्हायोलीन (राग सोहिनी, भीम)
  7. अ डेलीकेत टच टू डॉन (राग जोगकंस, देश )
  8. एन. राजम ह्यांच्याबरोबर टुगेदर (राग भैरवी, मालावी, बिलाहाराई, तोडी)
  9. डेडीकेशन्स तू डॉन (राग मिलन की तोडी, बैरागी, सुहा सुघाराई )
  10. संगीता शंकर (राग तोडी,बैरागी)
  11. म्युझीक थेरपी फॉर मायग्रेन - टाईम्स म्युझीक (राग दरबारी कानडा)
  12. सौंदर्या (राग श्याम कल्याण)

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Sangeeta Shankar — Page 2". Sangeeta Shankar. 2020-03-26 रोजी पाहिले.[permanent dead link]
  2. ^ "Sangeeta Shankar - Wikiwand". www.wikiwand.com. 2020-03-26 रोजी पाहिले.
  3. ^ "Sangeeta Shankar - Wikiwand". www.wikiwand.com. 2020-03-26 रोजी पाहिले.
  4. ^ "#LifeisMusic - What it takes to be a professional musician: Dr. Sangeeta Shankar Interview Part – I". Bollywood Life (इंग्रजी भाषेत). 2020-03-27 रोजी पाहिले.
  5. ^ "Sangeeta Shankar — Page 2". Sangeeta Shankar. 2020-03-26 रोजी पाहिले.[permanent dead link]
  6. ^ "Artist - Sangeeta Shankar (Violin), Gharana - None". www.swarganga.org. 2020-03-26 रोजी पाहिले.
  7. ^ "Sangeeta Shankar — Page 2". Sangeeta Shankar. 2020-03-26 रोजी पाहिले.[permanent dead link]
  8. ^ "Artist - Sangeeta Shankar (Violin), Gharana - None". www.swarganga.org. 2020-03-26 रोजी पाहिले.