Jump to content

संगीतकारांची आकाशगंगा

संगीतकारांची आकाशगंगा

संगीतकारांची आकाशगंगा हे भारतीय कलाकार राजा रवि वर्मा यांचे १८८९ मधील चित्र आहे. हे चित्र कॅनव्हासवरील तैलचित्र आहे. ४९ x ४३ इंच आकाराचे हे चित्र सध्या श्री जयचामा राजेंद्र आर्ट गॅलरी, जगनमोहन पॅलेस, म्हैसूर येथे आहे.

रविवर्मा यांच्या सर्वात प्रसिद्ध चित्रांपैकी एक असलेल्या या चित्रात ११ भारतीय महिलांचे चित्रण केले आहे, ज्या एका विस्तृत संगीत सादरीकरणात दिसतात. यापैकी काही बसलेल्या तर काही उभ्या आहेत. काही जणांकडे वाद्ये आहेत, तर काही जण ऐकत आहेत. रविवर्मा या चित्रात प्रत्येक स्त्रीला भारतातील विविध प्रदेश किंवा समुदायांशी संबंधित विविध प्रकारचे कपडे आणि अलंकार परिधान करताना दाखवतात. उजवीकडे एक मुस्लिम स्त्री आहे, डावीकडे वीणा वाजवणारी आणि नायर वस्त्र परिधान केलेली नायर स्त्री आणि मध्यभागी मराठी नववधूंच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीच्या आणि हिरव्या काचेच्या बांगड्या घातलेली मराठी स्त्री आहे. डावीकडे मागच्या रांगेत उभ्या असलेल्या एका महिलेने पंखा धरला आहे आणि ती पारशी समाजातील नक्षीदार बॉर्डर असलेली साडी नेसते, तर तिच्या शेजारी असलेली महिला ब्रिटिश किंवा इंडो-युरोपियन महिलेसारखा ड्रेस आणि पंख असलेली टोपी घालते.

गॅलक्सी ऑफ म्युझिशियन मधील प्रत्येक स्त्रिया केवळ भारताच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक विविधतेचेचे प्रतीक नाहीत, तर कलाकाराच्या मते स्त्रीत्व आणि सौंदर्याच्या आदर्श रूपांचे प्रतिनिधित्व करताना दिसतात: त्या तरुण, गोरी त्वचा, आकर्षक, इष्ट आणि संयमी आहेत. चित्रातीलील फक्त दोन स्त्रिया (मागील रांग, उजवीकडे) दर्शकांच्या नजरेला भेटतात. इतर सर्व स्त्रिया मोठ्या प्रमाणात दर्शकांच्या उपस्थितीबद्दल अनभिज्ञ आहेत आणि एखाद्या (बहुधा पुरुष) दर्शकाच्या दृश्य आनंदासाठी प्रदर्शनात दिसतात.

बाह्य दुवे

संदर्भ