Jump to content

संगारेड्डी जिल्हा

संगारेड्डी जिल्हा
సంగారెడ్డి జిల్లా(तेलुगु)
तेलंगणा राज्यातील जिल्हा
संगारेड्डी जिल्हा चे स्थान
संगारेड्डी जिल्हा चे स्थान
तेलंगणा मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यतेलंगणा
मुख्यालयसंगारेड्डी
निर्मिती११ ऑक्टोबर २०१६
मंडळ२६
क्षेत्रफळ
 - एकूण ४,४६४ चौरस किमी (१,७२४ चौ. मैल)
भाषा
 - अधिकृत भाषा तेलुगु
लोकसंख्या
-एकूण १५,२७,६२८ (२०११)
-लोकसंख्या घनता३४२ प्रति चौरस किमी (८९० /चौ. मैल)
-शहरी लोकसंख्या ३४.६९%
-साक्षरता दर६४.०८%
-लिंग गुणोत्तर१०००/९६५ /
राष्ट्रीय महामार्गराष्ट्रीय महामार्ग ६५, राष्ट्रीय महामार्ग १६१
वाहन नोंदणी TS-15[]
संकेतस्थळ


संगारेड्डी हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक जिल्हा आहे.[] २०१६ साली मेडक जिल्ह्यापासून हा जिल्हा वेगळा करण्यात आला. २०११ साली संगारेड्डी जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे १५.२७ लाख इतकी होती. हा जिल्हा तेलंगणाच्या पश्चिम भागात कर्नाटक राज्याच्या सीमेवर असून ह्या जिल्ह्याचा काही भाग हैद्राबाद महानगरामध्ये मोडतो. राष्ट्रीय महामार्ग ६५ व राष्ट्रीय महामार्ग १६१ संगारेड्डी जिल्ह्यामधून धावतात. संगारेड्डी येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.

२०१६ मध्ये जिल्ह्यांच्या पुनर्रचनेनंतर संगारेड्डी जिल्हा मेदक जिल्ह्यापासून विभाजित झाला आहे; मेडक जिल्हा तीन जिल्ह्यांमध्ये विभागला गेला आहे. ते आहेत संगारेड्डी जिल्हा,मेदक जिल्हा,सिद्दिपेट जिल्हा.

रामलिंगेश्वर मंदिर, नंदीकांडी

निजामाच्या काळात मेदकचा शासक राणी शंकरम्मा यांचा मुलगा सांगा या शासकाच्या नावावरून हे नाव देण्यात आले.

प्रमुख शहर

भूगोल

संगारेड्डी जिल्ह्याचे क्षेत्रफळ ४,४६४ चौरस किलोमीटर (१,७२४ चौरस मैल) आहे. जिल्‍ह्याच्‍या सीमा मेदक, मेडचल, विकाराबाद, कामारेड्डी आणि रंगारेड्डी जिल्ह्यांसह आणि कर्नाटक राज्याच्या सीमेसह आहेत.

लोकसंख्या

२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, सध्याच्या संगारेड्डी जिल्ह्याची लोकसंख्या १५,२७,६२८ आहे, लिंग गुणोत्तर हे १००० पुरुषमागे ९६५ स्त्रिया आहेत. साक्षरता दर ६४.०८% आहे. जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या ३४.६९% लोक शहरी भागात राहतात.

२०११ च्या जनगणनेच्या वेळी, ७१.९७% लोक तेलुगू, १५.६३% उर्दू, ५.०३% लंबाडी, ३.८४% कन्नड, १.७६% हिंदी आणि १.३२% मराठी भाषा बोलत होते.

मंडळ (तहसील)

संगारेड्डी जिल्ह्या मध्ये २६ मंडळे आहेत: जिल्ह्यात नारायणखेड, संगारेड्डी आणि झहीराबाद हे तीन महसूल विभाग आहेत.[]

नुक्रम संगारेड्डी महसूल विभागअनुक्रमझहीराबाद महसूल विभागअनुक्रमनारायणखेड महसूल विभाग
संगारेड्डी १५ झहीराबाद २१ नारायणखेड
कंदी १६ मोगुडमपल्ली २२ कांगटी
कोंडापूर १७ न्यालकल २३ काल्हेर
सदाशिवपेठ १८ झारासंगम २४ सिरगापूर
पटांचेरूवु १९ कोहिर २५ मनूर
आमीनपूर २० रायकोड २६ नागलगिद्दा
रामचंद्रपुरम
मुनिपल्ली
जिन्नाराम
१० गुम्मडीदला
११ पुलकल
१२ आंदोल
१३ वटपल्ली
१४ हतनुरा

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

संदर्भ

  1. ^ https://www.transport.telangana.gov.in/html/registration-districtcodes.html
  2. ^ Sravan (2018-02-11). "Telangana New Districts Names 2018 Pdf TS 31 Districts List". Timesalert.com (इंग्रजी भाषेत). 2022-01-31 रोजी पाहिले.
  3. ^ "Tehsil | District Sangareddy, Government of Telangana | India" (इंग्रजी भाषेत). 2022-01-31 रोजी पाहिले.