संगम साहित्य
संघम् साहित्य (तमिळ: தமிழ் இலக்கியம்) ही तामिळ साहित्यातील एक सर्वात प्राचीन अभिजात साहित्यकृती,तामिळ संघम् काळात इ.स.पूर्व ६००-ते इ.स.३०० ह्या काळात ह्याची निर्मिती झाली. संघमसंहिता ही प्राचीन समाजात लोकप्रिय असणाऱ्या विषयांवरील वेच्यांचा संग्रह आहे. कित्येक शतकापूर्वी एकामागून एक अशा तीन विद्वत्परिषदा (संघम्) भरल्या होत्या व त्यापैकी शेवटची मदुराईत भरली होती. अनेक कवी व भाट यांची कवने संघम् काव्यसंग्रहात समाविष्ट केलेली आहेत. यामध्ये प्राचीनतम स्तरातील एट्टुतोगाई आणि नंतरच्या काळातील इ.स.पू. २०० ते इ.स.पू. ३०० मधील पट्टुपट्टु ग्रंथांचा समावेश होतो. त्यात नंतर भर पडली ती तमिळ व्याकरणावरील तोल्काप्पियम आणि नीतिपरग्रंथ तिरूक्कुरल यांची.मणीमेखलाई हाही संगम साहित्यातील प्रसिद्ध ग्रंथ आहे.