Jump to content

संगमेश्वर

  ?संगमेश्वर
कसबा
महाराष्ट्र • भारत
—  नगर  —
Map

१७° ११′ १३″ N, ७३° ३३′ ११″ E

प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ३७ मी
जवळचे शहररत्‍नागिरी
प्रांतकोकण
जिल्हारत्‍नागिरी
लोकसंख्या
लिंग गुणोत्तर
३३,९९३ (2011)
१,०९७ /
भाषामराठी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
• आरटीओ कोड

• 415611
• +०२३५४
• MH 08
संगमेश्वर
जिल्हारत्‍नागिरी जिल्हा
राज्यमहाराष्ट्र
लोकसंख्याN/A
२००१
दूरध्वनी संकेतांक०२३५४
टपाल संकेतांक४१५६११
वाहन संकेतांकMH-०८
निर्वाचित प्रमुखN/A
(सरपंच)

संगमेश्वर हे रत्‍नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक गाव आहे. या तालुक्याचे मुख्यालय संगमेश्वर गावापासून १७ किलोमीटरवर असलेल्या देवरुख येथे आहे. देवरुख गावात संगमेश्वर तालुक्याचे पंचायत समिती कार्यालय आहे.[]

सोनवी आणि शास्त्री या दोन नद्यांच्या संगमावर हे शहर वसले असल्याने याला संगमेश्वर असे नाव मिळाले आहे. ते परिसरातील एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत येथून रत्‍नागिरीपर्यंत बोटीने जाता येत असे. संगमेश्वर हे मुंबई - गोवा महामार्गावर (राष्ट्रीय महामार्ग ६६वर) वसलेले आहे. तसेच कोकण रेल्वेने देखील संगमेश्वरला जाता येते. संभाजीराजांचे मुख्य ठाणे शृगारपूर हे संगमेश्वरच्या जवळच आहे.

प्रसिद्ध मार्लेश्वराचे देऊळ येथून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर आहे. मार्लेश्वर हे देवालयातील साप आणि देवालयापाठच्या नयनरम्य धबधब्यासाठी प्रसिद्ध आहे.

औरंगजेबाच्या सैनिकांनी मराठ्यांचे राजे संभाजी महाराज यांना संगमेश्वर येथील एका देवळात पकडले आणि चालवत चालवत आळंदी जवळच्या तुळापूरला नेले.

भूगोल

संगमेश्वर हे शहर शास्त्री नदी आणि सोनवी नदी या दोन नद्यांनी जोडले आहे. शहराच्या पूर्वेकडे पश्चिम घाट पसरला आहे व शहराच्या पश्चिमेकडे गणपतीपुळे हे पर्यटनस्थळ आहे.हा प्रदेश उष्णकटिबंधीय आहे.जून ते ऑक्टोबर दरम्यान येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो.एकाच दगडात कोरलेला मुख्य देवळाचा कळस हे शहराचे प्रवेशद्वार मानले जाते.

आख्यायिका

संगमेश्वर हे देवळांचे गाव आहे. या परिसरात सुमारे ७० पांडव कालीन देवालये आहेत. त्यातले कर्णेश्वराचे एका दगडातून कोरलेले भव्य देऊळ विशेष प्रसिद्ध आहे. ह्या महादेवाच्या देवालयात ५ पालथी ताटे कोरलेली आहेत. आख्यायिकेनुसार पांडव वनवासात असताना त्यांनी कर्ण नामक राजाच्या पणानुसार एका रात्रीत एका दगडातून हे देवालय कोरले. त्यानंतर थकून भागून ते जेवायला बसले असता कोंबडा आरवला. पांडव तसेच त्यांची ताटे पालथी टाकून उठले. देवालयात पांडवकालीन लिपीत कोरलेले लेख आहेत. जेव्हा हे लेख कोणी वाचू शकेल तेव्हा पालथी पाने सुलटी होतील आणि त्या मनुष्याला ताटांखाली लपलेले द्रव्य मिळेल, अशी समजूत आहे. कर्णेश्वराच्या देवालयाजवळ एक सूर्य मंदिर आहे.

=== प्रसिद्ध ===.

मार्गदर्शिका

संगमेश्वर बस स्थानकापासून संगमेश्वर रेल्वेस्टेशन ४ कि.मि.अंतरावर आहे. संगमेश्वर बस स्थानकापासून देवरुख १७ कि.मि.अंतरावर आहे. साखरपाला जाण्यासाठी दर ३०मिनिटांनी देवरुख येथून बस आहेत. 'कोल्हापूर'ला जाण्यासाठी या मार्गाचा वापर होऊ शकतो तसेच संगमेश्वराहून रत्‍नागिरी ,लांजा,आणि राजापूरकडे जाणाऱ्या बसेस आहेत.

प्रेक्षणीय स्थळे

कर्णेश्वर मंदिर[]

संदर्भ

  1. ^ Mikaberidze, Alexander (2011-07-22). Conflict and Conquest in the Islamic World: A Historical Encyclopedia [2 volumes]: A Historical Encyclopedia (इंग्रजी भाषेत). ABC-CLIO. p. 609. ISBN 9781598843378.
  2. ^ महाराष्ट्र टाईम्स रविवार ४ जुलै २०२१